Wednesday, August 20, 2025 10:29:03 PM

Narayan Rane: मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेनं संपवलं; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेने संपवलं असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंवर केला आहे.

narayan rane मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेनं संपवलं नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई: माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसतात. आताही त्यांनी उद्धव ठाकरे बिनकामाचा माणूस आहे. मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेने संपवलं असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंवर केला आहे. 

उद्धव ठाकरेला राजकारण कळत नाही. सत्ता गेल्यापासून ते डिप्रेशनमध्ये आहेत. काहीही बेताल बोलतात. सरन्यायाधीशांना न्यायालयात उभं राहून वकिला मार्फत विनंती केली जाते. अशी जाहीर रित्या केली जात नाही. एवढी पण माहिती हया माणसाला नाही. असा माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी होता हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. काहीही बालिशपणे बोलतो अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसेच त्यांनी खासदार संजय राऊत यांनाही लक्ष केलं आहे. उद्धव ठाकरेंचे मार्गदर्शक संजय राऊत आहेत. उबाठा शिवसेना संपवली आता शेपूट पण राहील नाही. आता घरी बस बडबड करू नको असे टीकास्त्र राणेंनी डागलं आहे. 

हेही वाचा: Rahul Gandhi on Savarkar Defamation Case: 'पुण्यात यायला असुरक्षित वाटतं'; न्यायालयात हजर राहण्यावरून राहुल गांधींचं धक्कादायक वक्तव्य

'मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेंनी तडीपार केलं'
मला हसायला येतं. मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेंनी तडीपार केलं, संपवलं. 60 टक्क्यावरुन आता 18 टक्क्यांवर मराठी माणूस आला आहे. आता भाजपाची सत्ता आहे. त्यात उबाठाचं स्थान काय? असा सवाल राणेंनी विचारला आहे. पुढच्या निवडणुकीत शिवसेना दिसणार नाही. उद्धव ठाकरेंनी बोलू नये. ते बिनकामाचे आहेत. आता आमची सत्ता येणार उद्धव ठाकरे बिनकामाचा माणूस असल्याची टीका राणेंनी केली. 

'तुझं काम काय ते सांग'
राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करतं आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाचे आभारही मानले आहेत. त्यामुळे कोणाचे आभार मानतो बोलायला काय?, निवडणूक आयोग भारतीय संविधाप्रमाणे काम करतो. एवढी ह्याला अक्कल नाही. आभार मानून लोकांवर काय इफेक्ट होणार आहे. आभार मानन्यापेक्षा तुझं काम काय ते सांग असा सवाल त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केला आहे. 


सम्बन्धित सामग्री