Thursday, August 21, 2025 04:55:10 AM

Nashik: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद टोकाला

नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद टोकाला गेल्याच पाहायला मिळतंय. 'नाशिक - त्र्यंबकेश्वर' की 'त्र्यंबकेश्वर - नाशिक' असा वाद पेटला.

nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद टोकाला

नाशिक: नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद टोकाला गेल्याच पाहायला मिळतंय. 'नाशिक - त्र्यंबकेश्वर' की 'त्र्यंबकेश्वर - नाशिक' असा वाद पेटला असून नाशिकमध्ये हा वाद चांगलाच टोकाला गेल्याच दिसून येतंय. यामध्ये नाशिकचे माहित देखील आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकचे महंत सुधीरदास नकली असून महंत सुधीरदासांनी आखाड्याचं प्रमाणपत्र सादर करावं अशी टीका त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वती महाराज यांनी केलीय. दरम्यान यासंदभात बैठक पार पडली असून या बैठकीत काय घडलं पाहुयात: 

हेही वाचा: Saurabh Murder Case: जेलमध्ये बिघडली तब्येत , डॉक्टरांनी केली चाचणी

बैठकीत काय घडलं ?
वादाबाबत अखिल भारतीय आखाडा परिषदेची बैठक
काही खोट्या महंतांनी विनाकारण वाद उकरून काढला
महंत सुधीरदासांचा आखाड्याशी काय संबंध ?
महंत सुधीरदास यांनी महामंडलेश्वर पद कुठून आणलं?
नाशिकचे महंत अनिकेत शास्त्रीदेखील भिक्षुक ब्राह्मण
मुख्यमंत्री त्र्यंबकेश्वरच्या नावाबाबत योग्य तो निर्णय घेतील 

दरम्यान नाशिक-त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर-नाशिक? हा  आगामी कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद चांगलाच पेटला असून  शैव - वैष्णव आखाड्यांचे साधू-महंत आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच नाशिकच्या महंतांना अभ्यासाची गरज असल्याचं म्हणत  तंत्रकौलाचार्य पंडित मयुरेश दिक्षित यांनी टोला लगावलाय. त्यामुळे आता आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद अजूनच टोकाला गेला असून आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेणार हे पाहून महत्वाचं ठरणारे. 


सम्बन्धित सामग्री