नाशिक: गेल्या काही महिन्यात ग्रामपंचायतीच्या संबंधित अनेक घटना समोर आल्या आहेत. मग ते वादविवाद असो की सदस्यांमधील मारामारी असो. अशातच आता पुन्हा एकदा ग्रामपंचायतीत तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. गावात ग्रामसभा सुरु असताना अचानक दोन गट आमने सामने आले. यामध्ये एका गटाकडून लाकडी दाडक्याने हल्ला करण्यात आला. तर दुसऱ्या गटाकडून खुर्च्या फेकून मारण्यात आल्या. ग्रामसभेदरम्यान काही मिनिटे हा राडा सुरु होता. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. या घटनेने खळबळ माजली असून ही हाणामारी चर्चेचा विषय ठरली आहे.
ग्रामपंचायतीच्या बैठकीत विविध समस्या, मुद्द्यांना घेऊन बाचाबाची किंवा किरकोळ वाद होत असतात. पण नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायतीत तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. विषय मंजुरीवरुन ग्रामपंचायतीच्या सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीवेळी लाकडी दांडके आणि खुर्च्यांचा समावेश करण्यात आला. या राड्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे.