अमरसिंह पाटील.प्रतिनिधी. कोल्हापूर: मंगळवारी, राज्या्चे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांचा वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजित पवार 67व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या पार्श्वभूमीवर, 'अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे', अशी प्रार्थना करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला साकडे घातले आहे.
हेही वाचा: कोकाटेंनी तातडीने राजीनामा द्यावा; सुप्रिया सुळेंची ट्वीट करत मागणी
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस कोल्हापुरचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी करवीर निवासीनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन, 'अजित पवार यांना दीर्घायुष्य लाभो आणि लवकरच ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन आई अंबाबाईच्या दर्शनाला यावे', अशी प्रार्थना केली. या दरम्यान, देवीचा अभिषेक करण्यात आला.
अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. अजित पवारांचे सुरूवातीचे शिक्षण बारामती येथील बालविकास मंदिर याठिकाणी झाले. त्यांनी दहावीचे शिक्षण मुंबईतील विल्सन कॉलेज, गिरगावमधून केली. मात्र, दहावीमध्ये अजित पवार एका विषयात नापास झाले. पण, पुढील वर्षी त्यांनी तो विषय कव्हर केला. यानंतर, त्यांनी अकरावीच्या शिक्षणासाठी कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.