पुणे : पुण्यातील स्वारगेटमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. पीडित तरुणी आणि आरोपी दत्तात्रय गाडेची यापूर्वी ओळख नसल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोघांचे मागील सहा महिन्याचे कॉल रेकॉर्ड तपासले. या तपासात मागील सहा महिन्यात दोघांमध्ये कधीही संपर्क झाला नसल्याचे समोर आले आहे.
साताऱ्यातील 26 वर्षीय तरुणीवर स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला. बलात्कार करुन दत्तात्रय गाडे फरार झाला. पोलिसांनी दोन दिवसात त्याचा शोधल लावला आणि त्याला अटक केली. त्यानंतर बलात्कार प्रकरणात वकिलांकडून दावे प्रतिदावे करण्यात आले. सरकारी वकील आणि आरोपीचे वकिलांनी कोर्टात बाजू मांडली. सरकारी वकिलांनी आरोपीची गुन्हेगार पार्श्वभूमी सागंत त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली. तर आरोपीच्या वकिलांनी बलात्कार परस्पर संमतीने झाला असल्याचे सांगितले. यामुळे स्वारगेट प्रकरणातील तरुणीची सर्व स्तरातून बदनामी होत आहे.
हेही वाचा : संभाजीनगरमधील स्मशानभूमी ठरली चोरट्यांची गुप्त तळ
आरोपीच्या वकिलांनी केलेल्या दावामुळे तरुणीच्या मानसिकतेवरही परिणाम झाला. यानंतर स्वारगेट प्रकरणी पीडित तरुणीचं चारित्र्यहनन थांबवा असे सरकारी वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे. तसेच असीम सरोदे यांनी तरुणीची बदनामी थांबवण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीच्या वकिलांनी वसंत मोरे यांच्यामार्फत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
दरम्यान पीडित तरुणीवर सातत्याने आरोप होत आहेत. बलात्कारावेळी तरुणीने आरडाओरडा का केला नाही असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यावर बोलताना दत्तात्रय गाडेने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने आरडाओरडा केला नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणामुळे तरुणीची नाहक बदनामी होत आहे. बलात्कारावेळी ओरडली तर जावे मारेन अशी धमकी गाडेने तिला दिली होती. जीवाच्या भीतीने पीडित तरुणीने काहीच आवाज केला नाही. पण याचाच गैरफायदा घेऊन तिच्यावर आरोप केले जात आहेत. यामुळेच पीडित तरुणीच्या वकिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली आह आणि यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.