Thursday, August 21, 2025 02:24:57 AM

निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी

वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण  शुक्रवारी नेपाळमधून पोलिसांनी अटक करण्यात आली. त्यानंतर आता त्याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण  शुक्रवारी नेपाळमधून पोलिसांनी अटक करण्यात आली. त्यानंतर आता त्याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 

वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप निलेशवर आहे. त्यातूनच त्याला पोलिसांनी नेपाळमधून ताब्यात घेतले. आज निलेश चव्हाणला तीन जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे आणि निलेश चव्हाण यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला हे तपासायचं आहे. वैष्णवी हगवणे यांनी मृत्यूपूर्वी निलेश चव्हाणला फोन केला होता असा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला आहे. त्यावर ही सगळी थेरी आहे. व्यक्ती धरायचा आणि मग त्याच्याविरोधात पुरावे गोळा करायचे असा प्रकार सुरु आहे. सर्व कलमे जामीनपात्र आहेत असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. 

वैष्णवी हगवणेला करिष्मासोबत मिळून निलेश चव्हाणने त्रास दिला आहे. याबाबत त्यांच्याकडे तपास करायचा आहे. मोबाईल डेटादेखील यांनी डिलिट केला आहे. तो रिकव्हर करायचा आहे. करिष्मा आणि शशांक हगवणेचा मोबाईल सापडला नाही. मोबाईल त्यांच्याकडेच आहेत. ते जप्त करायचे आहेत. म्हणून याची कस्टडी हवी असल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे. निलेश चव्हाणच्या वकिलांनी म्हटले की केवळ बाळ त्यांच्याकडे होत म्हणून या प्रकरणात नाव घेण्यात आलं. त्यानंतर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडे शस्त्राचा परवाना आहे पण त्यांनी शस्त्र कुठेच वापरले नाहीत. हे गुन्हे का दाखल करण्यात आले असा सवालही यावेळी आरोपीच्या वकिलांनी केला. 

हेही वाचा : सरनाईकांच्या वक्तव्यावरुन मोठा राजकीय गदारोळ

वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहआरोपी असलेल्या निलेश चव्हाण याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले. शुक्रवारी निलेश चव्हाण याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती आणि आज त्याला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

निलेश चव्हाणचा नेपाळ प्रवास
10 दिवसानंतर निलेश चव्हाणला बेड्या ठोकल्या आहेत. बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. निलेश चव्हाण नेपाळमध्ये लपून बसला होता. निलेश पुण्यातून दिल्लीला कारने गेला. दिल्लीतून दुसऱ्या कारने उत्तर प्रदेशातील गोरखपूरला गेला. गोरखपूरमधून निलेश नेपाळला पोहोचला. नेपाळमधील भैरवा जिल्ह्यातील एका गावात दबा धरून बसला. भैरवा जिल्ह्यातील एका लॉजमध्ये निलेश लपून बसला होता. निलेशवर वैष्णीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळ काही दिवस निलेशकडे होते. बाळ ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबीयांना निलेशनं बंदुकीचा धाक दाखवल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. 


सम्बन्धित सामग्री