Sunday, August 31, 2025 05:25:30 PM

मुंडेंच्या आईच्या नावाचा वापर करून आक्षेपार्ह टिप्पणी; गुन्हा दाखल

सद्या मंत्री धनंजय मुंडे याच नाव चांगलच चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याला चांगलेच धारेवर धरले.

मुंडेंच्या आईच्या नावाचा वापर करून आक्षेपार्ह टिप्पणी गुन्हा दाखल

बीड : सद्या मंत्री धनंजय मुंडे याच नाव चांगलच चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याला चांगलेच धारेवर धरले. याच पार्शवभूमीवर मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरून होती. मुंडे नाव चर्चेत असतांनाच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या आईचे नाव देखील चर्चेत आलेय. बीडमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या आईबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

हेही वाचा: 'या' दिवशी मिळणार लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता

एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडिया साईटवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचे चुलत बंधू अजय मुंडे यांनी बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचं देखील समोर आलंय. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या आई रुख्मिणीबाई पंडितराव मुंडे यांच्या नावाचा वापर करुन सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांचे भाऊ आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी पुराव्यांसह सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. अजय मुंडे यांनी टिप्पणीबाबतची माहिती आणि पुरावे सादर केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात यूट्यूबधारकावर गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान आधीच सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव चर्चिले जात असतांनाच आता आता त्यांच्या आई रुख्मिणीबाई पंडितराव मुंडे यांच्या नावाचा वापर करुन सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आलीय. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पोलीस आता यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे. 
 


सम्बन्धित सामग्री