पुणे : पुण्यात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणावर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. बुधवारी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर दत्तात्रय गाडे नावाच्या इसमाने बलात्कार केला. पुण पोलिसांकडून आरोपी गाडेचा शोध सुरू आहे.
पुण्यात झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर प्रशासन एॅक्शन मोडवर आहेत. शिवशाही बसमध्ये हा बलात्कार झाल्याने स्वारगेट बस स्थानकात नेमकं चाललंय तरी काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. या बलात्कारनंतर प्रशासनाकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. हेच नाही तर पुण्यातील बंद बस, स्वारगेट बस स्थानक परिसरातील गोष्टींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हेही वाचा : Pune Bus Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची अजब युक्ती
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात बंद पडलेल्या बसेसमध्ये कंडोमची पाकिटं पाहायला मिळाली आहेत. तसेच बसेसमध्ये कंडोम, साड्या, चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र देखील असल्याचे समोर आले आहे. पुणे डेपोतील शिवशाही बसमध्ये धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे पुण्यात चाललंय तरी काय? हा सवाल निर्माण झाला आहे. या सगळ्या प्रकारामुळे पुण्यात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळेच प्रशासनाकडून पुण्यातील बलात्कार प्रकरणावर कसून चौकशी केली जात आहे.
पुण्यातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध सुरू आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीचा ड्रोनद्वारे शोध करण्यात येत आहे. दत्तात्रय गाडे उसाच्या शेतात लपल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा : Rape Case: बापानेच केलं पोटच्या मुलींसोबत असे कृत्य वाचून होईल संताप
पुण्याच्या स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बस मध्ये 26 वर्षीय तरुणवरती बलात्कार करणारा आरोपी मुळचा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी असून धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पुण्यात दुष्कृत्य करून आपल्या गावात सकाळी 11 वाजता पोहचला. पाच वाजेपर्यंत त्यानी घरी विश्रांती घेऊन तो गावातच मुक्काम केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून आरोपीवर पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत आरोपी सध्या फरार झाला असून त्याचा पोलीस कसून तपास करत आहेत.