Monday, September 01, 2025 11:03:22 AM

Pankaja Munde : मी बीडची नागीण, गोपीनाथ मुंडेंची वाघीण; पंकजा मुंडे गरजल्या

मी बीड जिल्ह्याची नागीण आणि गोपीनाथ मुंडेंची वाघीण आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पाटोदा येथे संत मीराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती.

pankaja munde  मी बीडची नागीण गोपीनाथ मुंडेंची वाघीण पंकजा मुंडे गरजल्या
मी बीडची नागीण, गोपीनाथ मुंडेंची वाघीण; पंकजा मुंडेंची गर्जना

बीड जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलंच तापलेलं आहे. संतोष देशमुख प्रकरणामुळं बीड जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. या प्रकरणावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना टारगेट केलं जात आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या घडामोडीदरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. मी बीड जिल्ह्याची नागीण आणि गोपीनाथ मुंडेंची वाघीण आहे, असं वक्तव्य पंकजा यांनी केलं आहे. पाटोद्यातील एका कार्यक्रमात जोरदार भाषण करत त्यांनी आपल्या विरोधकांना थेट ललकारलं आहे.

पाटोदा येथे संत मीराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी बीड जिल्ह्याची नागीण आहे आणि गोपीनाथ मुंडेंची वाघीण आहे. तुम्ही सर्वजण माझ्या लाडक्या बहिणी आहात. मी मंत्री झाले किंवा नाही. मला याचं काही फरक पडत नाही. पण मी मंत्री झाल्यानं तुम्हाला न्याय देवू शकते.

 

हेही वाचा - महालक्ष्मी सरस २०२५ विक्री आणि प्रदर्शन सुरू

प्रयागराज कुंभ मेळ्याविषयी पंकजा काय म्हणाल्या -

राजकारण आणि धर्मकारण यामध्ये नातं असलं पाहिजे. मात्र, धर्मकारण करणाऱ्या व्यक्तींनी राजकारणात ढवळाढवळ करू नये. प्रयागराजमध्ये कुंभ मेळ्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. मला भगवान बाबांचे दर्शन घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज लागत नाही. फक्त डोळे झाकले तरी माझं दर्शन होतं. जर भगवान बाबांची मूर्ती घट्ट धरून बसून पापी विचार असतील, तर कदापीही भगवान बाबाचं दर्शन होणार नाही, असं देखील पंकजा म्हणाल्या.

हेही वाचा - लोणार सरोवर परिसरातील विकास कामांना गती देण्याची मागणी

आपल्या भाषणात पंकजा यांनी बीड जिल्ह्याच्या विकासावर भर देण्याचे आश्वासन दिले. त्या म्हणाल्या की, राज्यात 1 हजार 825 दिवस सत्तेचे आहेत. त्यापैकी 1 हजार 600 दिवसांत दररोज या जिल्ह्याला किमान 10 कोटी रुपये विकासासाठी देईन. मला आष्टीवर जास्त प्रेम करावं लागेल. मी आष्टीत प्रत्येक कामात लक्ष देणार असल्याचं देखील पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. 

 

 


सम्बन्धित सामग्री