मुंबई: तळीरामांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR) ने हॉस्पिटॅलिटी उद्योगावर लादलेल्या करांमध्ये प्रचंड वाढ केल्याच्या निषेधार्थ सोमवारी 14 जुलै रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या संपाचा एक भाग म्हणून, महाराष्ट्रातील सर्व परमिट रूम आणि बार आज दिवसभर बंद राहणार आहेत.
दारूवरील मूल्यवर्धित कर (VAT) दुप्पट करणे, परवाना शुल्कात 15% वाढ करणे आणि उत्पादन शुल्कात 60% वाढ याच्या प्रतिसादात हा बंद पुकारण्यात आला आहे. AHAR च्या मते, या अचानक आणि अत्यधिक कर सुधारणांमुळे लहान आणि मध्यम आकाराच्या आस्थापनांवर मोठा आर्थिक भार पडला आहे, ज्यापैकी अनेकांना टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरण; आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ
दरम्यान, इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने आपल्या एक्स पोस्टमध्ये याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटलं आहे की, 'या अन्याय्य कर वाढीमुळे हॉस्पिटॅलिटी उद्योग गंभीर तणावाखाली आहे. या बंदचा उद्देश मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गमावणे आणि असंख्य व्यवसाय बंद पडू शकणाऱ्या संकटाकडे लक्ष वेधणे आहे.'
हेही वाचा - शनिशिंगणापूर देवस्थानावर भ्रष्टाचाराचा कोप ; CM देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडमध्ये
AHAR ने महाराष्ट्र सरकारला कर रचनेचा पुनर्विचार करण्याची आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या शाश्वततेला पाठिंबा देणारी धोरणे स्वीकारण्याची विनंती केली आहे. असोसिएशन सर्व भागधारकांना - रेस्टॉरंट मालक, बार ऑपरेटर आणि संबंधित व्यवसायांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आणि उद्योगाच्या भविष्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे.