Thursday, August 21, 2025 02:55:45 AM

पायलटकडून एअर होस्टेसवर बलात्कार; मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एका 23 वर्षीय एअर होस्टेसने तिच्या सहकाऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. हा सहकारी खाजगी विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत आहे.

पायलटकडून एअर होस्टेसवर बलात्कार मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Edited Image

मुंबई: मुंबईजवळील मीरा रोड परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 23 वर्षीय एअर होस्टेसने तिच्या सहकाऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. हा सहकारी खाजगी विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पायलटने तिच्यावर मीरा रोड येथील घरी बलात्कार केला.

वृत्तांनुसार, पीडित आणि आरोपीने काही दिवसांपूर्वी लंडनच्या फ्लाइटने एकत्र प्रवास केला होता. मुंबईला परतल्यानंतर, दोघेही एकाच परिसरात राहात असल्यामुळे एकत्र मीरा रोडला प्रवास करत होते. पायलटच्या आग्रहाखातर ती त्याच्या घरी गेली होती. परंतु, यावेळी पायलटच्या घरात इतर कोणीही नव्हते. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. 

हेही वाचा - सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी नराधम बापाने विकली स्वतःची मुलगी

आरोपीविरोधात गुन्हा दाखल - 

दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून, नवघर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पायलट सध्या फरार आहे. पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. 

पुण्यातील एअरपोर्ट शटल ड्रायव्हरवर बलात्काराचा आरोप

तथापी, दुसऱ्या एका घटनेत पुण्यातील इंदिरा गांधी विमानतळाजवळ कार्यरत एका एअरपोर्ट शटल सर्व्हिस ड्रायव्हरवर एका 25 वर्षीय महिला प्रवाशेने बलात्काराचा आरोप केला होता. तिच्या तक्रारीनुसार, रात्री आरोपीने महिलेला त्याच्या घरी नेले. तेथे त्याने पीडिवर जबरदस्ती केली. या गुन्ह्यातील आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

हेही वाचा किडनी विकण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांकडून दहिसरमधील तरुणाची 3 लाखांची फसवणूक

विमानवाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांशी संबंधित लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत आहेत, ज्यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. पायलट, शटल ड्रायव्हर, ट्रॅव्हल एजंट, हॉटेल कर्मचारी यांच्याकडून महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना, प्रशिक्षित कर्मचारी, आणि विश्वासार्ह आंतरिक तक्रार निवारण यंत्रणा उभारणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या घटनांचा गांभीर्याने विचार करत, सरकार, पोलीस यंत्रणा आणि संबंधित कंपन्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी संयुक्त पावले उचलणं ही काळाची गरज आहे. 


सम्बन्धित सामग्री