जळगाव : छावा चित्रपट पाहून खजिना मिळेल या आशेने मध्यप्रदेशातील महाराष्ट्राच्या सीमे जवळच असलेल्या बऱ्हाणपूरमध्ये जवळ जवळ शंभर खड्डे खोदून खजिना मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांकडून करण्यात आला. छावा चित्रपटात आशीरगडावर मुघलांचा खजिना असल्याचा उल्लेख आहे. इतकेच नव्हे तर खजिन्याच्या शोधासाठी रात्री टॉर्च लावून परिसरात खड्डे खोदले, चाळणीने माती चाळून टाकली.
विकी कौशल याच्या ‘छावा’ या चित्रपटाने देशाला वेड लावले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवे विक्रम करत आहेत. छावा पाहिल्यानंतर मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूरमध्ये जवळील आशीरगड परिसरात खजिना शोधला जात आहे. रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीने खजिना शोधला जात असल्याचे समोर आलं आहे.
हेही वाचा: 'महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस भूमिका घेणार'
छावा चित्रपटात बऱ्हाणपूरचा उल्लेख आलेला आहे आणि बऱ्हाणपूरमध्ये मुघलांचा खजिना होता असाही उल्लेख आहे. म्हणून हा चित्रपट पाहून बऱ्हाणपूर जवळील आशीरगड परिसरात नागरिकांनी खजिन्याच्या शोधात चक्क शंभरपेक्षा जास्त खड्डे खोदले. अंधारात टॉर्च लावून चाळण्यानी येथील मातीही त्यांनी गाळून खजिना शोधण्याचा प्रयत्न केला.
औरंगजेबची तिजोरी म्हटल्या जाणाऱ्या बऱ्हाणपूरमध्ये लोक रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीने मुगलांचा खजिना शोधत आहेत. छावा चित्रपट पाहिल्यानंतर बऱ्हाणपूरपासून जवळ असलेल्या अशीरगड किल्ल्यावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि परिसर पिंजून काढला जात आहे. या संदर्भात प्रशासनाला समजताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.