सोलापूर: पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा सुरू असताना सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले की, 'ऑपरेशन सिंदूर हा सरकारने दाखवलेला मीडियाचा होता'. खासदार प्रणिती शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यात संतापाची लाट पसरली आहे. तसेच, सोलापूरात भाजपच्या कार्यकर्त्यांचा संताप उसळला आहे. या दरम्यान, विरोधकांनी प्रणिती शिंदेंवर देशद्रोहाचा आरोप केला आणि त्यांच्या प्रतिमेला काळे फासून जोड्याने मारण्यात आले.
'काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे विधान महिलांच्या स्वाभिमानाचा अपमान करणारे आहे', असा आरोप करत 'प्रणिती शिंदेंनी माफी मागावी', अशी मागणी भाजपने केली आहे. तसेच, भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रणिती शिंदे यांचा निषेध नोंदवला आणि 'इथून पुढे असे वक्तव्य सहन केले जाणार नाही', असा इशाराही दिला आहे.
'मी माफी मागणार नाही' - प्रणिती शिंदे
या दरम्यान, सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट विधान केले, 'मी माफी मागणार नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे'. पुढे, प्रणिती शिंदेंनी सरकारला टोला लगावला की, 'आम्हाला देशभक्तीचे धडे शिकवू नये'.
हेही वाचा: सभागृहात कोकाटे 18 मिनिटे रमी खेळत होते; रोहित पवारांचा दावा
त्या आपल्या मतदारसंघाच्या खासदार आहेत याची...
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव म्हणाले की, 'खासदार प्रणिती शिंदे या आपल्या मतदारसंघाच्या खासदार आहेत याची आज खंत वाटत आहे. ज्या 'ऑपरेशन सिंदूर'ला जगाने मान्य केले, त्याला नाकारणे म्हणजे देशभक्तांचा आणि भारतीय सैन्य दलाचा अपमान आहे'.