भिवंडी : बांगलादेशात मागील दोन महिन्यांपासून अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. कट्टर पंथीय मुस्लिमांकडून बांगलादेशातील हिंदूंची घरे दुकाने जाळली जात आहेत. तर महिलांवर पाशवी अत्याचार होत आहेत. याविरोधात भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे सकल हिंदू समाजातर्फे निदर्शने करण्यात आली.
बांगलादेशाचे इस्लामी सरकार देखील अल्पसंख्याक हिंदूवरील अन्यायास मूकसंमती देत आहे याचा निषेध करण्यात आला. भारत सरकारने हिंदूंवरील अत्याचार शांत फूट बसणे बंद करून बांगलादेश सरकारला चोख उत्तर देण्याची गरज आहे. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर भारतातील हिंदू शांतपणे पाहत बसणारे नसून भारत सरकारने याचा प्रति हल्लाकरून निषेध नोंदवला पाहिजे. वेळ पडल्यास पॅरामिलिटरी बांगलादेशामध्ये घुसवली पाहिजे जेणेकरून तेथील हिंदूंना वाचवता येईल यासाठी वेळ पडल्यास प्रत्येक हिंदू आर्थिक मदत देण्यास तयार आहे असे आव्हान विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत धर्मचारी मनोज जोशी यांनी केले आहे.
बांगलादेशमध्ये हिंदू, मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलित बांधवांवर अत्याचार केले जात आहेत. या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंनादेखील बांगलादेश सरकारने देशद्रोह्यांची अत्यंत जुलमी अशी कलमे लावून तुरुंगात डांबले आहे. स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशमधील हिंदूंची संख्या ३८ टक्के होती. ती आज केवळ आठ टक्केच राहिली आहे.