Monday, September 01, 2025 04:45:29 AM

धर्मांतर करणाऱ्या युपीतील छागुर बाबाचं पुणे कनेक्शन उघड

धर्मांतर करणाऱ्या उत्तर प्रदेशातील छागुर बाबाचं पितळ उघड पडलं आहे. अशातच आता त्याचं पुणे कनेक्शन समोर आलं आहे. छागुर बाबा लोणावळ्यातील 16 कोटींची जमीन खरेदी करण्यासाठी आला होता.

धर्मांतर करणाऱ्या युपीतील छागुर बाबाचं पुणे कनेक्शन उघड

पिंपरी चिंचवड: धर्मांतर करणाऱ्या उत्तर प्रदेशातील छागुर बाबाचं पितळ उघड पडलं आहे. अशातच आता त्याचं पुणे कनेक्शन समोर आलं आहे. छागुर बाबा लोणावळ्यातील 16 कोटींची जमीन खरेदी करण्यासाठी आला होता. जमीन खरेदीच्या नावाखाली पुण्यातील एकाला फसवल्याची माहिती समोर आली आहे. 

छागुर बाबा तब्बल 16 कोटी रुपये किंमत असलेली जमीन खरेदी करण्यासाठी पुण्यात आला होता. मात्र जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात त्याने मोहम्मद खान नामक व्यक्तीला फसविल्याची माहिती आता समोर आली. 

हेही वाचा: Jansuraksha Bill: जनसुरक्षा विधेयक सरकारचं नवं अस्त्र?

यूपीतील धर्मांतर करणाऱ्या छागुर बाबाचा पुणे कनेक्शन

धर्मांतरण करून अनेकांची फसवणूक करत, करोडोची माया जमविणाऱ्या  उत्तर प्रदेशातील छागुर बाबाचं पुणे कनेक्शन समोर आलं आहे. भामटा छागूर बाबाने पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात तब्बल 16 कोटी रुपये किंमत असलेली जमीन खरेदी करण्यासाठी पुण्यात आला होता. त्यावेळी त्याने खरेदीचे सर्व दस्त नोंदणीही केली होती. मात्र या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात त्याने मोहम्मद खान नामक व्यक्तीला फसविल्याची माहिती आता समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या हा तोच मोहम्मद खान आहे. जो आरोपी छागुर बाबाचा पुण्यातील हस्तक आणि त्याचा अकाउंटन्ट म्हणून ओळखला जात आहे.  मात्र आता या बाबाच्या पुणे कनेक्शनमध्ये आणखी एक नाट्यमय वळण आलंय आणि ते म्हणजे याच मोहम्मद खानने बाबाचे काळे कारनामे उघड करत त्याच्या टोळीत इतर अनेक जण असून त्यांचे काळे कारनामे उघडं केले आहेत. तसेच मी त्यांचा अकाउंटन्ट नाही, पीडित आहे. छागूर बाबाने माझी जमीनीच्या व्यवहारात फसवणूक केली आहे. मावळमधील वडगाव कोर्टात मी छागूर बाबावर गुन्हा दाखल केला आहे. असे  मोहम्मद अहेमद खानने सांगितले आहे. 

धर्मांतराचं ग्लोबल रॅकेट?
छागुर बाबाला 500 कोटींचं फंडिंग होत असल्याचे समोर आले आहे. नेपाळमध्ये 100 बँक अकाऊंट उघडण्यात आली. या अकाऊंटमध्ये पाकिस्तान, दूबईतून पैसे येतात. सौदी, तूर्कस्तानातूनही पैसे आल्याची माहिती आहे. 300 कोटींचा व्यवहार नेपाळच्यामार्गे केला आहे. 


सम्बन्धित सामग्री