Thursday, August 21, 2025 04:39:13 AM

Pune Swargate ST Depot Case: दत्ता गाडेला जन्मठेप की आणखी कठोर शिक्षा? जाणून घ्या कायदा काय सांगतो?

स्वारगेट एसटी बस डेपो बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेवर नव्याने तीन गंभीर कलमे लावण्यात आली आहेत.

pune swargate st depot case दत्ता गाडेला जन्मठेप की आणखी कठोर शिक्षा जाणून घ्या कायदा काय सांगतो
Pune Swargate ST Depot Case: दत्ता गाडेला जन्मठेप की आणखी कठोर शिक्षा? जाणून घ्या कायदा काय सांगतो?

पुण्यातील स्वारगेट एसटी बस डेपो बलात्कार प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेवर नव्याने तीन गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. त्यामुळे त्याच्यावर जन्मठेपेची टांगती तलवार आहे. काल पुणे क्राईम ब्रँचने त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) 64(2)(M), 115(2) आणि 127(2) या कलमांची वाढ केली. यामुळं गाडेवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.

पुणे पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेवर पीडित महिलेचा रस्ता अडवणे, तिला मारहाण करणे आणि जबरदस्तीने २ वेळा संभोग करणे अशा गंभीर स्वरुपाच्या कलमांची वाढ केली आहे. हे अतिरिक्त कलम सिद्ध झाल्यास दत्ता गाडेला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.

हेही वाचा -  नाशिकमध्ये कृष्णा आंधळे फिरत असल्याचा दावा ठरला..; नाशिक पोलिसांचा खुलासा

काल स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणातील दत्ता गाडेची पोलीस कोठडी संपली. त्यामुळे त्याला पुणे न्यायालयासमोर सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. पुणे सत्र न्यायालयाने दत्ता गाडेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हा केल्यानंतर दत्तात्रय गाडेने आपला मोबाईल फोन गायब केला आहे. पोलिस अजूनही त्याचा फोन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये पीडितेच्या जबरदस्तीचे पुरावे असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - दादा खिंडकरकडून मारहाण झालेल्या ओमकार सातपुतेचा व्हिडीओ समोर; कोण आहे ओमकार सातपुते?

दरम्यान, या घटनेनंतर पुणे पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. अतिरिक्त कलमे लावल्यानंतर आता या प्रकरणाचा न्यायालयीन लढा अधिक गंभीर होत आहे. जर न्यायालयात या तिन्ही कलमांचा दोष सिद्ध झाला, तर दत्ता गाडेला जन्मठेप किंवा किमान १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते.


सम्बन्धित सामग्री