मुंबई : राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला राम राम करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शक्तिप्रदर्शन करत राजन साळवी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या उपस्थितीत त्यांनी धनुष्यबाण हाती घेतलं.
आनंदआश्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंतही उपस्थित होते,
हेही वाचा : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलं नवं आयकर विधेयक
राजकीय कारकिर्द
राजन साळवी यांनी भारतीय विद्यार्थी सेनेपासून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाले. 2004 मध्ये बाळासाहेबांच्या हस्ते शिवतीर्थवर राजन साळवींचा सन्मान करण्यात आला. 2006 मध्ये पोटनिवडणूक लढवली. 2006च्या पोटनिवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 ची विधानसभा निवडणूक त्यांनी जिंकली.
शिवसेना पक्षप्रवेशानंतर काय म्हणाले राजन साळवी?
महायुतीत असताना मला मंत्रिपद मिळेल असे वाटले होते. पण विनायक राऊतांमुळे माझे मंत्रिपद हुकले असा गौप्यस्फोट साळवींनी केला. शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. राजा का बेटा राजा नहीं बनेगा. जो काम करेगा वही राजा बनेगा असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन साळवींचे शिवसेनेच स्वागत केले.
ज्यांना आम्ही मोठं केलं त्यांनीच विरोधात काम केलं असे म्हणत राजन साळवींनी विनायक राऊतांवर जोरदार टीका केली आहे. विनायक राऊतांना आम्ही मोठं केलं असा दावा राजन साळवींना केला आहे.