पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरीतील मुळशी शाखेचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या म्हणजेच वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. 'तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. मात्र, आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे', असा गंभीर आरोप वैष्णवी हगवणे यांच्या आईने राजेंद्र हगवणे तसेच हगवणे कुटुंबीयांवर आरोप केला आहे. यादरम्यान, 'राजेंद्र हगवणे कुटुंबाला जन्मठेप झाली पाहिजे', अशी मागणी देखील केली आहे.
हेही वाचा: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात नवरा, सासू आणि नणंदेला अटकेत
वैष्णवीची आई म्हणाली:
'बाळ झाल्यानंतर ती खुप आनंदी होती. मात्र, हुंड्यासाठी हगवणे कुटुंबियांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. दुर्दैव म्हणजे, दीर आणि वहिनी या पवित्र नात्याला देखील वैष्णवी यांच्या दीराने काळिमा फासला. याचं कारण म्हणजे जेव्हा वैष्णवीच्या दीराने वैष्णवीला मारलं तेव्हा तिची मनस्थिती बिघडली होती. जेव्हा मंचरला गेले होते, तेव्हाच तिचं आणि माझं शेवटचं बोलणं झालं होतं. जेव्हा, मी मंचरहून घरी परतले तेव्हा मला फोन आला की वैष्णवी गेली म्हणून. सध्या त्या बाळाची काय अवस्था आहे? ते कुठे असेल? याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. जेव्हा ती माहेरी आली होती, तेव्हा ती स्वतःसोबत सासूलादेखील साड्या घेतली होती', वैष्णवी यांच्या आठवणी सांगताना वैष्णवीच्या आईंना अश्रू अनावर झाले. पुढे वैष्णवी यांची आई म्हणाली की, 'अजित पवार यांच्याकडे एकच मागणी आहे की, माझ्या मुलीला न्याय द्या. शिक्षा झाली पाहिजे त्या नराधमाला. संपूर्ण हगवणे कुटुंबाला जन्मठेप झाली पाहिजे', असे वैष्णवीची आई म्हणाली.
हेही वाचा: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर; वैष्णवीने मैत्रिणीला काय सांगितले?
पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे, त्यांचा मुलगा आणि त्यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर फरार आहेत. सासरे राजेंद्र हगवणे, तिची सासू, पती, मेहुणे आणि मेहुण्यांसोबत, हुंड्यासाठी वैष्णवीवर अमानुष छळ केल्याचा आरोप आहे. प्रेम विवाहादरम्यान, राजेंद्र हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या माहेरच्यांकडून लग्नात 51 तोळे सोने घेतले होते. त्यासोबतच फॉर्चुनर गाडी, 7 किलो वजनाची चांदीची ताटं, भांडी, अधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठी, वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखांचा मोबाईल गिफ्ट, माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला 50 हजार ते 1 लाख रूपये दिले जात होते. मात्र, जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी वैष्णवीच्या माहेरच्यांनी पूर्ण न केल्यामुळे वैष्णवीचा छळ करण्यात आला होता. ज्यामुळे तिने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. इतकंच नाही, तर पती शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावरून संशय घेत होता. हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीला प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे राजेंद्र हगवणेंची सून वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर, अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.