Wednesday, August 20, 2025 10:49:58 PM

पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनु कुकडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बाललैगिंक अत्याचाराअंतर्गत त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शंतनु कुकडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शंतनु कुकडे जबरदस्तीने गरीब कुटुंबियांचे धर्मांतर करत असल्याचा देखील आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर केला आहे. शंतनु कुकडे याचा पुणे कॅम्प परिसरात आलिशान बंगला आहे. या बंगल्यात तो गरजु विद्यार्थांसाठी राहण्याची सोय करतो. काही महिन्यांपूर्वी बंगल्यात दोन मुली राहण्यासाठी आल्या होत्या. त्यापैकी एक अल्पवयीन होती. या दोन मुलींनी शंतनु कुकडेने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केल्यानंतर कुकडेवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शंतनु कुकडे हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय होता. त्यामुळेच पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्षपद त्याच्याकडे सोपवण्यात आलं होतं.

हेही वाचा : Viral Video: रस्त्यावरच टॉवेल गुंडाळून मॉडेलची अंघोळ,गर्दीसमोरच बदलले कपडे; धक्कादायक कृत्यावर नेटकरी थक्क!

शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार रवीद्र धंगेकर यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. शंतनु कुकडे याने दोन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप धंगेकरांनी कुकडेवर केला आहे. तसेच त्यातील एक अल्पवयीन असल्याने त्याच्यावर पोक्सोचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शंतनु कुकडे गरीब कुटुंबियांचे जबरदस्तीने धर्मांतर करत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. दरम्यान कुकडेवर पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनु कुकडे याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराअंतर्गत पोक्सोचा गुन्हा करण्यात आला आहे. 


सम्बन्धित सामग्री