मुंबई : शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दलालीची दलदल या पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे सांगण्याचा प्रयत्न करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाल्याने महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पुण्यातील बलात्कार प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण, मंत्री कोकाटे यांना झालेली शिक्षा, वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार निघाल्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढ झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमदार रोहित पवार यांनी एका पुस्तिकेच्या माध्यमातून घोटाळ्याची मालिकाच मांडली आहे. यामधून त्यांनी 11 घोटाळे समोर आणले आहेत.
हेही वाचा : मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जनकल्याण यात्रेचा शुभारंभ
अर्थसंकल्पीय आधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार रोहित पवारांकडून पहिल्याच दिवशी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. 'दलालीची दलदल' या पत्रिकेच्या माध्यमातून सरकारचे घोटाळे उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारचे 11 घोटाळे मांडत आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. रुग्णवाहिका घोटाळा, दूध घोटाळा, भोजनपुरवठा घोटाळा, एमएसआईडीसी घोटाळा, कंत्राटी भरती घोटाळा, एमआयडीसी जमीन घोटाळा, आनंदाचा शिधा घोटाळा, पुणे रिंग रोड घोटाळा, समृद्धी महामार्ग घोटाळा, एमएसआरडीसी घोटाळा,रक्तपेढी परवानगी घोटाळा आदी घोटाळ्यांचे यादी आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे.
महाराष्ट्राला दलालीच्या दलदलीत अडकून पाहणाऱ्या सत्ताधारी दलालांचा खरा चेहरा समोर आणणे गरजेचं होतं आणि ते काम आम्ही प्रामाणिकपणे केलं आणि भविष्यातील करत राहणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
घोटाळ्यांची यादी, सरकारची गोची?
रुग्णवाहिका घोटाळा
दूध घोटाळा
भोजनपुरवठा घोटाळा
एमएसआईडीसी घोटाळा
कंत्राटी भरती घोटाळा
एमआयडीसी जमीन घोटाळा
आनंदाचा शिधा घोटाळा
पुणे रिंग रोड घोटाळा
समृद्धी महामार्ग घोटाळा
एमएसआरडीसी घोटाळा
रक्तपेढी परवानगी घोटाळा