मुंबई : सतीश भोसले यांच्या मुजोरीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. विद्यार्थ्यांना धमकी देतानाचा हा व्हिडीओ समोर येत आहे. जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. लहान मुलांना हात-पाय तोडून टाकण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. सतीश भोसले हा भाजपाचा कार्यकर्ता आहे.
कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा बीडमधल्या शिरुर कासारचा रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे. भाजपाच्या महाराष्ट्र राज्य भटके-विमुक्त आघाडीचं पद त्याच्याकडे आहे तसेच सतीश भोसलेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अलिकडच्या काळात भोसलेची सुरेश धसांसोबत जवळीक होती. सुरेश धसांचा कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाल्यानं त्याचा दबदबा वाढला.
हेही वाचा : देशमुखांच्या हत्येचा कट कुठे आणि कसा शिजला?, साक्षीदारांच्या जबाबातून स्पष्ट
नुकतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसलेचा एका गरीब व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल केला होता. तसेच पाचशेच्या नोटांचा बंडल फेकतानाचा व्हिडीओदेखील व्हायरल केला होता. यावरून भोसलेची बीडमधील दहशत दिसून आली. यानंतर दमानिया यांनी सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर भोसलेला अटक करण्याची मागणी दमानियांनी यांनी केली.
या प्रकरणानंतर आमदार सुरेस धस यांच्यावर आरोप होत आहेत. सतीश भोसले धसांचा कार्यकर्ता आहे. सरकारने काय कारवाई केली सांगत नाही. सतीश भोसलेला उचलून जेलमध्ये टाका असे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.