Thursday, August 21, 2025 03:38:08 AM

Latur Crime: लातूरमधील सेक्स रॅकेटचा भांडाफोड

लातूर शहरात औरा स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा अनैतिक मानवी व्यापार वाहतूक कक्षाच्या पोलिसांनी भांडाफोड केला आहे. दिल्ली, मुंबई, तेलंगणा राज्यातील पाच पीडित तरुणींची सुटका केली आहे.

latur crime लातूरमधील सेक्स रॅकेटचा भांडाफोड

लातूर : लातूर शहरात औरा स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा अनैतिक मानवी व्यापार वाहतूक कक्षाच्या पोलिसांनी भांडाफोड केला आहे. दिल्ली, मुंबई, तेलंगणा राज्यातील पाच पीडित तरुणींची सुटका केली आहे. 

लातूर शहरातील रिंग रोड परिसरात औरा स्पा व मसाज सेंटरमध्ये परप्रांतीय तरुणींना आणून अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय चालतो अशी माहिती अनैतिक मानवी व्यापार वाहतूक कक्षाच्या पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला आणि देहविक्री करणाऱ्या परप्रांतीय पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या स्पा सेंटरच्या मॅनेजरसह त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : नागपुरात महिलेचा घरातच खून; परिसरात खळबळ

लातूर शहरामधील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मसाज - स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. या घटनेत औरा स्पा सेंटरच्या मॅनेजरसह तिघांना अटक करण्यात आले आहे. अनैतिक मानवी व्यापार वाहतूक कक्षााने धडक कारवाई केली आहे. या औरा स्पा सेंंटरमध्ये काम करणाऱ्या पीडित तरुणांची सुटका करण्यात आली आहे. यात दिल्ली, मुंबई, तेलंगणा राज्यातील तरुणींचा समावेश आहे.  

 

 


सम्बन्धित सामग्री