Sunday, August 31, 2025 11:22:55 AM

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने खळबळ

महाराष्ट्रात अनेक राजकारणी नेहमी काहीना काही वक्तव्य करत असतात. त्यातच आता शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय.

 शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याने खळबळ

महाराष्ट्र: महाराष्ट्रात अनेक राजकारणी नेहमी काहीना काही वक्तव्य करत असतात. त्यातच आता शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्याने सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. 'ठाकरे गटाला 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं' असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलंय. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. आधीच ठाकरे गटातून अनेक जण बाहेर पडत असल्याने उद्धव ठाकरेंचे टेंशन वाढले आहे. त्यातच आता नीलम गोऱ्हे यांनी हे वक्तव्य केल्यानं सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ST संदर्भात मोठा निर्णय

कोण आहेत नीलम गोऱ्हे? 

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडे पक्षातील एक जबाबदार आणि विश्वासू व्यक्तिमत्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिलं जातं होतं. नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या विधान परिषदेवर शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात. प्रवक्त्या म्हणून त्या माध्यमांसमोर शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडत असतात. राज्यातील महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्यानं आवाज उठवत असतात. शिवसेनेची पुणे जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडं आहे. शिवसेनेतील एक अभ्यासू महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. आतापर्यंत तीनदा त्या विधानपरिषदेवर निवडून गेल्या आहेत.

पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएसएएमची पदवी त्यांनाी घेतली. 1992 मध्ये त्यांनी बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमाही पूर्ण केला आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांनी युवक क्रांती दल म्हणजेच युक्रांदच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. पब्लिकन पक्षातून राजकीय सुरुवात कामगार, मजूर, शोषित यांच्याप्रमाणेच स्त्री मुक्तीसाठी त्या काम करत होत्या. 1987 पासून नीलम गोऱ्हे पूर्णवेळ सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी झाल्या. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात त्यांनी भारिपमध्ये प्रवेश केला. भारिपच्या तिकीटावर त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती. पुढे त्यांनी काही काळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतही काम केलं होतं. दरम्यान 'ठाकरे गटाला 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं' असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडालीय. 


सम्बन्धित सामग्री