पुणे : गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाने पुण्यातील वातावरण तापले आहे. गर्भवती महिलेच्या कुटुंबियांकडून उपचाराआधी दहा लाख रूपयांची मागणी करण्यात आली होती. परंतु तीनच लाख दिल्याने गर्भवती महिलेवर उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र या सगळ्यात महिलेचा मृत्यू झाला. तनिषा भिसे असं या महिलेचं नाव होतं. या प्रकारामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकारावर राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिक आणि पतित पावन संघटनेने आंदोलन केले आहे.
दीनानाथ रूग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे. तसेच पतित पावन संघटनेनेही आंदोलन छेडले आहे. दीनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलकांनी डॉक्टरांवर चिल्लर फेकली. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डाला काळ फासण्यात आलं आहे. प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करू अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. तसेच या प्रकरणात समोर आलेली माहिती अर्धवट असून, दिशाभूल करणारी असल्याचे रवी पालकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या समितीचा अहवाल समोर; रुग्णालयाने आरोप फेटाळले
दीनानाथ रूग्णालयासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले आहे. रूग्णालय प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनावेळी रवींद्र पालेकर यांच्या तोंडावर नाणी फेकण्यात आली. रवींद्र पालेकर हे रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी आहेत. शिवसैनिकांनी चिल्लर फेकत आंदोलन केले आहे. रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णालयाच्या बोर्डवर काळं फासलं आहे.
भाजपा आमदार अमित गोरखे यांनी हा मुद्दा उचलून धरला. अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे गर्भवती असल्याने तिला तातडीने सुरुवातीला दीनानाथ मंगेशकर या धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र हॉस्पिटलने उपचार करण्यापूर्वी तिच्या कुटुंबियांकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली. कुटुंबाने फक्त तीनच लाख रुपये आता आम्ही जमा करू शकतो असे सांगितले. त्यानंतर दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने गर्भवतीला उपचार नाकारून दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवले होते. त्यात तिला उपचार मिळण्यात दिरंगाई झाल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र तिचा मृत्यू होण्यापूर्वी तिने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. त्या जुळ्या बाळांची आई दीनानाथ हॉस्पिटलच्या आर्थिक लुबाडणुकीमुळे दगावली आहे असा आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला. तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यूने प्रकरण चघळले आहे.