Monday, September 01, 2025 01:21:06 AM

शिवशाही बस बंद होणार ? चर्चेला उधाण

गेल्या काही दिवसांपासून शिवशाही बस अपघातांच्या घटनांमुळे राज्यभरात ही सेवा बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र....

शिवशाही बस बंद होणार  चर्चेला उधाण

मुंबई: शिवशाही बसच्या वाढत्या अपघात घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच वाढलेल्या शिवशाही बसच्या अपघातांमुळे शवशाही बस सेवा बंद होणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. दरम्यान, शिवशाही बस सेवा बंद होणार असल्याच्या अफवांना एसटी महामंडळाने स्पष्ट नकार दिला आहे. एसटी महामंडळाने या चर्चांना मूळ नसल्याचं सांगत प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.एसटी महामंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, शिवशाही बस सेवा प्रवाशांच्या सोईसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवशाही बस या राज्यभर प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय असून, ती वेळेवर सेवा आणि आरामदायक प्रवासासाठी ओळखली जाते.

महामंडळाने प्रवाशांना आवाहन केलं आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये. अपघातांमुळे आलेल्या आव्हानांना सामोरं जात असतानाही महामंडळाने बस सेवेत सुधारणा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. चालक व तांत्रिक कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जात असून, वाहनांची नियमित तपासणी केली जात आहे.

शिवशाही बस ही महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे या सेवेवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही, याची एसटी महामंडळाकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे.त्यामुळे शिवशाही बस बंद होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे 


 


सम्बन्धित सामग्री