Wednesday, August 20, 2025 11:31:26 AM

नाशिकमधून धक्कादायक बातमी; कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा

नाशिकमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कृषी मंत्राच्या जिल्ह्यामध्येच युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे.

नाशिकमधून धक्कादायक बातमी कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा

नाशिकमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कृषी मंत्राच्या जिल्ह्यामध्येच युरियाचा कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. शेतीसाठीचा 90 टन युरिया गोदरेज अॅग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात गेले आहे. पशुखाद्य तयार करण्यासाठी वापर केला जात होता. हरियाणा आणि कोलकाता परिसरातून लाखोंचा कृषी अनुदानित युरिया आला होता. मात्र, सरकारी अनुदानित 90 टन युरिया बेकायदेशीरपणे बाळगल्यामुळे बुधवारी, 26 मार्च 2025 रोजी दिंडोरीमधील एका पशुखाद्य उत्पादकाविरोधात कृषि विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कंपनीचे संचालक, युरिया पुरवठादार कंपन्या, आणि वाहतूकदार अशा सर्व 9 जणांवर हा गुन्हा दिंडोरी पोलीस स्थानकात दाखल केला आहे. 

 

कंपनीमध्ये तपासणी केल्यावर:

पशुखाद्य बनवणाऱ्या या कंपनीची रसायन आणि खत मंत्रालयाचे अवर सचिव चेतराम मिणा यांनी या कंपनीची तपासणी केली आहे. यादरम्यान, कंपनीमध्ये तपासणी करताना 50 किलोची युरियायुक्त बॅग मिळाली आहे. याची किंमत  24 ते 28 रुपये किलो असल्याचे निदर्शनात आल्यानंतर हे औद्योगिक वापरासाठीचा युरिया नसून, शेती वापराचा अनुदानित युरिया असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे याठिकाणी शेती उपयुक्त युरिया वापरला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे 90 मेट्रिक टन वजनाच्या 50 किलो वजनाच्या 1800 बॅगा असा ऐवज सीलपॅक करून दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 


सम्बन्धित सामग्री