मुंबई: महाराष्ट्रातील भष्ट्राचाराची पोलखोल करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या 'द एन्काऊंटर' या विशेष कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध नेत्यांवर भाष्य केले. दमानिया यांनी खडसेंवर भाष्य केले.
अंजली दमानिया यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात खडसेंवर भाष्य केलं. खडसेंविरोधात लढत असताना मला एक कॉल आला. यावेळी तू अंजली बोल रही है ना, तू खडसे के खिलाफ लढना छोड दे. नहीं तो तेरा जिना हराम करेंगे असे या संभाषण मला म्हटलं गेलं. यानंतर मी फोन कट केला तेव्हा दाऊद 2 असं नाव दिसलं असे दमानिया यांनी सांगितले.
हेही वाचा: Anjali Damania Exclusive: अंजली दमानियांचे 'जय महाराष्ट्र'वर मोठे गोप्यस्फोट
तुम्ही लढता, सत्य समोर आणताना मुलं आई आता बस गं असं म्हणत नाहीत का? या प्रश्नावर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, " खडसेंविरोधात लढत असताना मला एक कॉल आला. यावेळी तू अंजली बोल रही है ना, तू खडसे के खिलाफ लढना छोड दे. नहीं तो तेरा जिना हराम करेंगे असे या संभाषण मला म्हटलं गेलं. यानंतर मी फोन कट केला तेव्हा दाऊद 2 असं नाव दिसलं. नंतर मी तो नंबर जॉईन सीपी क्राईम संजय सक्सेना यांना पाठवला. याचं पुढे काय झालं, त्यांनी मला अजूनही सांगितलं नाहीये. त्या दिवशी माझ्या घरच्यांनी मला सांगितलं, विशेषत: माझ्या मुलांनी सांगितलं होतं की मम्मा, दिज ईज टू मज. बाकी तू करते आम्ही काही म्हणत नाही पण हे फार होतयं".
अंजली दमानियांचे मोठे गोप्यस्फोट
अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात राजीनामा द्यायला भाग पाडले
अरविंद केजरीवालांनी चुकीच्या गोष्टी केल्या
धनंजय मुंडे पंकजा मुंडेंची फाईल घेऊन आले होते.
मुंडेंना क्लीनचिट मिळाली नाही, चिटरला क्लीनचिट मिळूच शकत नाही
कोकाटेंना राजकारणातून बाहेर काढून टाकायला पाहिजे होतं.
महाराष्ट्राला दहावी पास अर्थमंत्री लाभलेत तर 70 वर्षाचे क्रीडमंत्री नक्कीच चालले पाहिजेत
शिंदेंवर गंभीर आरोप
धसांची दहशत आणि गैरव्यवहार कमी नाहीत
आम आदमी पक्षात टिकू शकत नाही तर बाकी पक्षात नाही...
खडसेंविरुद्ध लढताना दाऊद 2 नंबरवरुन धमकीचा कॉल आला