मस्साजोगच्या सरपंच देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून मोठे राजकीय वादळ उठले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात न्यायासाठी मोठे आंदोलन उभारले होते, मात्र आता त्यांच्यावर संशयाचे ढग दाटले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धस यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची धन अजय मुंडे यांच्यासोबत 'डील' झाल्याचा दावा केला आहे.
धस यांच्या आक्रमकतेला अचानक ब्रेक?
सुरेश धस यांनी प्रारंभी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी धनंजय मुंडेंवर घणाघाती आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी धस आणि मुंडे यांची गुप्त भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर धस यांच्या आक्रमकतेला अचानक ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले. यावरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
हेही वाचा : राहुल गांधींच्या ‘त्या’ ट्वीटमुळे नवा वाद! नेत्यांच्या प्रतिक्रिया
संजय राऊतांचा थेट आरोप
"डील झालीय! सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले होते, त्यांनी आकावर हल्ले चढवले होते, अचानक त्यांनी पावले मागे का घेतली?" असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. धस यांनी काही कागदपत्रे आणि पुरावे उघड केले होते, मात्र आता तेच गप्प का बसले आहेत, यावर त्यांनी संशय व्यक्त केला. "कालपर्यंत आपण कोणासाठी लढत होतो, याचा विचार त्यांनी करायला हवा होता," असेही राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी पुढे दावा केला की, "मला एका महत्त्वाच्या व्यक्तीने सांगितले की, सुरेश धस हे लवकरच आपले आरोप मागे घेतील. ही त्यांची परंपरा आहे. मोठी डील करून शांत बसण्याची त्यांची सवय आहे." त्यामुळे आता धस यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : “छावा टॅक्स फ्री का नाही? मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट कारण!”
भाजप नेते बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धस यांचे बॉस आहेत. "त्यांच्याच बॉसने त्यांना या ट्रॅपमध्ये पकडले का?" असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. या हत्याप्रकरणाचा राजकीय रंग अधिकच गडद होत असून, धस यांची भूमिका आणि त्यावर होणाऱ्या राजकीय प्रतिक्रियांवर सर्वांचे लक्ष राहणार आहे.