यंदा चैत्र अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. लक्षात घ्या की एका महिन्यात दोन ग्रहण लागणार आहेत. मार्चमध्ये 14 तारखेला चंद्रग्रहण तर 29 मार्चला सूर्यग्रहण लागेल. या ग्रहणामुळे पितरांचे तर्पण आणि सूतक काल याबाबत लोकांमध्ये संभ्रम असू शकतो.
यंदा चैत्र अमावस्या शनिवारी असल्याने याला शनि अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी पितरांचे तर्पण केले जाते. असे मानले जाते की अमावस्येला पितरांचे तर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. यंदा ग्रहण असल्याने सूतक कालावधीविषयी योग्य माहिती घेणे आवश्यक आहे.
पुण्याहून तीन मुली निघाल्या दुबईला; चेकिंग करतांना धक्कादायक बाब आली समोर
खरं तर हे सूर्यग्रहण आंशिक असेल आणि भारतात दिसणार नाही. त्यामुळे या ग्रहणाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. यामुळे पितरांचे तर्पणही नेहमीप्रमाणे आपल्या वेळेवर करता येईल. तसेच या कालावधीत दान, तर्पण आणि पूजा करण्यास कोणतीही मनाई नसेल.
टाइम अँड डेट वेबसाइटनुसार, भारताच्या बाहेर सुमारे 814 दशलक्ष लोक हे आंशिक सूर्यग्रहण पाहू शकतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे सूर्यग्रहण दुपारी 2:20 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6:16 वाजता समाप्त होईल. 29 मार्च 2025 रोजी लागणारे हे सूर्यग्रहण उत्तर-पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिकेचा ईशान्य भाग, युरोप आणि उत्तर रशियामधून दिसेल.
हे ग्रहण कॅनडा, पोर्तुगाल, स्पेन, आयर्लंड, फ्रान्स, युनायटेड किंगडम, डेन्मार्क, जर्मनी, नॉर्वे, फिनलंड आणि रशिया येथून पाहता येईल. तसेच, दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्रांवरही या ग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नाही.
Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.