नागपूर: महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर नागपुरातील 400 वर्षे जुने प्राचीन कल्याणेश्वर मंदिर शिवभक्तांच्या गर्दीने गजबजले आहे. भगवान शिवाच्या दर्शनासाठी आणि रुद्राभिषेक करण्यासाठी हजारो भाविक सकाळपासून मंदिरात दाखल झाले आहेत.
भोसलेकालीन असलेल्या या ऐतिहासिक मंदिराचा 1968 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. वर्षभर येथे भक्तांची वर्दळ असतेच, मात्र महाशिवरात्री आणि श्रावण मासात येथे लाखोंच्या संख्येने शिवभक्त दाखल होतात.
हेही वाचा : घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची फ्री-स्टाईल हाणामारी!
यंदाही महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात भव्य रोषणाई, विशेष पूजा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. भोलेनाथांच्या मूर्तीला फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली असून, भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
“हर हर महादेव” च्या जयघोषात कल्याणेश्वर मंदिर भक्तिमय झाले असून, महादेवाच्या कृपेसाठी शिवभक्तांची आस्था ओसंडून वाहत आहे!