Thursday, September 04, 2025 07:37:27 AM

विद्येच्या माहेरघरात कोयता गँगचा थरार – आता घरात घुसून दहशत!

विद्येच्या माहेरघरात गुन्हेगारी थांबता थांबेना कोयता गँगची आता पुणेकरांच्या घरात घुसखोरी घरात घुसून दहशत माजवण्याचा प्रयत्न

विद्येच्या माहेरघरात कोयता गँगचा थरार – आता घरात घुसून दहशत

पुणे: पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्त्यांवर दहशत माजवल्यानंतर आता या गॅंगने थेट नागरिकांच्या घरात घुसून धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. दत्तनगर परिसरात घडलेल्या एका घटनेने स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. 

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही समाजकंटकांनी कोयत्याच्या धाकावर त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला आणि कुटुंबाला धमकावले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली असता, पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.

हेही वाचा: शिवनेरी गडावर मधमाशांचा हल्ला, वनविभागाची चौकशी सुरू

पीडित नागरिकांनी सांगितलं की, घटना घडल्यानंतर तात्काळ दत्तनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी 'दुपारी अकरा वाजल्यानंतर या' असं सांगून कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

स्थानिक नागरिकांना संरक्षण देण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी आणि कोयता गँगवर कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पुण्यात दिवसाढवळ्या घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


सम्बन्धित सामग्री