Wednesday, August 20, 2025 09:21:32 AM

'माला'ची प्रेरणादायी कहाणी! अपंगत्व ते महसूल अधिकारी, थक्क करणारा प्रवास

अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सानिध्यात वाढलेली त्यांची मानसकन्या माला हिची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

मालाची प्रेरणादायी कहाणी अपंगत्व ते महसूल अधिकारी थक्क करणारा प्रवास

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सानिध्यात वाढलेली त्यांची मानसकन्या माला हिची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. दोन्ही डोळ्यांनी अपंग असलेल्या मालाने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर परिस्थितीवर मात करतं एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. तिने मोठे यश संपादन केले.

जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत एक बाळ रडत होते. कुणाचे तरी नकोसे झालेले एक छोटेसे जिवंत अस्तित्व होते. डोळ्यात प्रकाश नव्हता, शरीर अत्यंत क्षीण होते. पण त्या क्षणी सुरू झाली एक विलक्षण आणि प्रेरणादायी कथा. अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांनी आई-वडिलांना नकोशी असलेल्या मालाचा सांभाळ केला व तिला शिकवलं. वझ्झर या ठिकाणी अंबादास पंत वैद्य बेवारस बालगृह आहे. या ठिकाणी आणून तिला शिक्षण शिकवलं व तिला बाप म्हणून स्वतःच नाव  शंकरबाबा पापळकर यांनी दिलं. शंकर बाबा यांच्या बेवारस मतिमंद अनाथ बालगृहात एकूण 123 बेवारस मतिमंद, गतिमंद अंध, अपंग मुले आहेत. यात 98 मुली व 25 मुले आहेत, यांचा सांभाळ स्वतः शंकरबाबा पापळकर करतात.

हेही वाचा: Narayan Rane: मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेनं संपवलं; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

माला पापळकर ही आई-वडिलांना नकोशी होती, म्हणूनच तिला जळगावच्या रेल्वे स्थानकावर फेकून दिलं, मात्र आता त्याच मालाचं कौतुक करण्यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसावले आहेत. मालाने वझ्झर बेवारस बालगृहानंतर अचलपूर, परतवाडा तसेच अमरावती शहरात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या दिव्यांग बालगृहातील जन्मजात दृष्टीहीन मानसकन्या एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे ती सुवर्णाक्षरात लिहिली जाणारी ऐतिहासिक घटना आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मालाशी संवाद साधला व तिच्या कागदपत्राची पडताळणी केली. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात मालाला नियुक्तीपत्र दिले जाईल.

बालगृहातील दृष्टीहीन मानसकन्येची उत्तीर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिच्या जीवनात प्रकाश आला तो शंकरबाबा यांच्यामुळे, त्यांनी मालाच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली. तिचे नाव 'माला' ठेवले आणि तिला केवळ आश्रयच नाही, तर ओळख दिली. शिक्षणाची ओढ, वाचनाची आवड, शंकरबाबांचा आधार, यामुळे माला शिकत गेली. ब्रेल लिपीतून दहावी, बारावी, त्यानंतर पदवी, पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. अपंगत्वाच्या मर्यादा झुगारून तिने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2019 पासून तिने स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. 2023 मध्ये तिने एमपीएससी 'ग्रुप सी' मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. तेव्हापासून ती नियुक्तीच्या प्रतिक्षेत होती. आता नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून तिची नियुक्ती झाली आहे. मालाला नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक या पदावर नियुक्ती मिळणार आहे.

हेही वाचा: Today's Weather Update : सायक्लोनिक सर्क्युलेशनचा फटका महाराष्ट्राला बसणार ; 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, होणार मुसळधार पाऊस

"माला आता सरकारी नोकरीवर लागली. याचा आनंद तिचे वडील शंकरबाबा पापळकर यांना झाला. आपल्या आयुष्याचं काहीतरी फलित झालं, तिने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली, अमरावती शहरातील अमोल पाटील यांचे युनिट अकॅडमी येथून तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. तिला या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि तिने मोबाईलवर यूट्यूबच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षेचे व्हिडीओ ऐकून ऑनलाइन अभ्यास केला, तिला डोळ्याने दिसत नाही, मात्र तिने सर्व दोन्ही कानाने ऐकून हे यश केलं", अशी प्रतिक्रिया समाज सुधारक शंकरबाबा पापळकर यांनी दिली. वझर या ठिकाणी मूकबधिर बेवारस बालगृह शंकरबाबा पापळकर चालवतात. ज्यांना आपल्या आई-वडिलांनी आणि समाजाने नाकारले त्या अंध, अपंग, गतिमंद, मतिमंद, बेवारस मुलांचा सांभाळ ते करतात. मात्र अठरा वर्षाचे मुले झाल्यानंतर त्यांना बालगृहात राहता येत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारने एक कायदा करावा व त्यांना बालगृह  या ठिकाणी राहू द्यावं अशी मागणी पापळकर यांनी केली. कारण ज्या बेवारस लोकांचा कोणी वाली नाही, ती बेवारस मुले 18 वर्षाचे झाल्यानंतर कुठे जाणार, कुठे राहणार याची चिंता शंकरबाबांना लागली आहे. "मी पद्मश्री पुरस्कार घेतला. त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी मला आस्वस्थ केलं की 18 वर्षावरील बेवारस मुलांसाठी मी कायदा करेल,  त्यानंतरच मी पद्मश्री पुरस्कार स्वीकारला", असे समाज सुधारक शंकरबाबा पापळकर यांनी सांगितले. 

जिद्द आणि चिकाटीने अपंगत्वावर मात करत  माला अखेर ती मोठी अधिकारी बनली. तिच्यासारख्या अंध, अपंग, बेवारस आणि अनाथ मुलांना तिने एक मोलाचा संदेश दिला आहे. आपल्या मनात जिद्द, चिकाटी असेल तर आणि चांगल्या लोकांचा सपोर्ट असेल तर आपण आपल्या अपंगातवर मात करू शकतो अशी प्रतिक्रिया माला यावेळी दिली. 


सम्बन्धित सामग्री