मुंबई : नुकतच अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. मात्र यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं अशी टीका ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सरकारचं अपयश, अस्वस्थता अधिवेशनात लपवण्यात आली असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर उद्धव ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरूच आहेत. मुंबईतील रस्त्यांच्या कामांवरुन घोटाळा सुरूच आहे. मुंबईत ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवलेत. वर्षानुवर्ष शांत असलेल्या नागपुरात जातीय दंगल झाली. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय अधिवेशनात झाला नसल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. तसेच कोरटकरला अटक मात्र सोलापूरकर अजूनही मस्तीत फिरतोय. कबरीपासून कामरापर्यंत जाणारं हे अधिवेशन असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
हेही वाचा : 'अधिवेशनात पाहुणे कलाकारासारखे आले अन्....'; शंभुराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
पाशवी बहुमत मिळाल्याचा सत्ताधाऱ्यांना माज आहे. शिंदे-फडणवीसांना छळतात की काय? असा प्रश्न पडतो असे उपहासात्मक टोला ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी सरकारवर लगावला आहे. खिशात नाही आणा, बाजीराव म्हणा, अशी सरकारची गत आहे. मुख्यमंत्र्यांकडून सर्वांना सावरण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यासह केंद्र सरकारलाही धारेवर धरले आहेत. मोदींचं सौगात-ए-मोदी म्हणत सौगात-ए-सत्ता आहे. निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देत असल्याचे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. सौगात घेऊन नेमकं कोण जाणार? असा सवालही त्यांनी केला. मुस्लिम गट आमच्याकडे आल्यास आम्ही हिंदुत्व सोडल्याची टीका करतात. भाजपानं त्यांच्या झेंड्यावरचा हिरवा रंग पुसावा. भाजपानं हिंदुत्व सोडलं, असं जाहीर करावं अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेना आमचीच, त्यांचा गद्दार गट आहे. सत्ता मिळवण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकतो. विरोधी पक्षनेते पदासाठी काही निकष असतील तर लिहून द्या. राज्यपाल सुसंस्कृत, त्यांच्याकडून अपेक्षा आहे. जनतेचा आवाज दाबवण्यासंदर्भात राज्यपालांकडे तक्रार आहे. तसेच मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावर बोलताना बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली. दरम्यान सत्तेसाठी सरकार सर्वांच्या गळाभेटी घेत फिरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.