Wednesday, August 20, 2025 04:30:15 AM

Pune Dahihandi Video Viral : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा प्रचंड उत्साह; मात्र, गर्दीच्या पुरामुळे चेंगराचेंगरीची भीती

मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास, चेंगराचेंगरी होऊन लोकांना इजा होण्याची शक्यता असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, अशा परिस्थितीत योग्य नियोजन आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे.

pune dahihandi video viral  श्रीकृष्ण जन्माष्टमीचा प्रचंड उत्साह मात्र गर्दीच्या पुरामुळे चेंगराचेंगरीची भीती

पुणे : गेल्या काही वर्षांपासून पुण्यात दहीहंडी उत्सवाची (Pune DahiHandi 2025) क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. जल्लोषात थिरकणारी तरुणाई आणि रस्त्यांवर झालेली प्रचंड गर्दी यातून उत्सवाची रंगत चांगलीच वाढते. मात्र, यंदा या उत्सवात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजी रस्त्यावरील बेलबाग चौकात दहीहंडी पाहण्यासाठी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे (Big Crowd for Dahi Handi Celebration in Pune) ढकलाढकली झाली. इतकेच नव्हे तर या गर्दीत टोळक्यांमध्ये भांडण आणि मारामारी झाल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

चेंगरा-चेंगरीचा धोका
चेंगराचेंगरी होण्याआधीच वाद आणि भांडणे पेटल्याने परिस्थिती गंभीर होण्याची भीती होती. पुण्यातील दहीहंडी उत्सवादरम्यान झालेली गर्दीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, दहीहंडी कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे, गणेशोत्सवातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास काय होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  इतक्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन एखादा अपघात घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या गर्दी नियोजनावर टीका होत आहे. फक्त दहीहंडी उत्सवासाठी एवढी गर्दी होत असेल, तर गणेशोत्सवाच्या काळात परिस्थिती कशी हाताळली जाणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरवर्षी लाल महालपासून मंडईपर्यंत दहीहंडीचा उत्साह दिसून येतो. यंदा, मात्र गर्दीमुळे गोंधळाचे चित्र निर्माण झाले. पुण्यात उंच थर बसवले जात नसले तरी उत्सव पाहण्याच्या क्रेझमुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसते.आता प्रशासन आणि पोलिसांनी दहीहंडी व आगामी गणेशोत्सवासाठी वेळेवर आणि योग्य नियोजन करणं अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा - Chinchpoklicha Chintamani First Look : 'चिंचपोकळीचा चिंतामणी' गणपतीची पहिली झलक समोर

पुण्यात दहीहंडीला झालेली गर्दी
पुण्यातील बेलबाग चौकात दहीहंडी उत्सवादरम्यान प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता निर्माण झाली होती, ज्यामुळे एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधून लोकांचा दहीहंडीबद्दलचा उत्साह स्पष्ट दिसून येत आहे. पण या आनंदाच्या क्षणी एक चिंताही निर्माण होत आहे. या घटनेमुळे, गणेशोत्सवातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्यास काय होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पुढील काळात गर्दीचे आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक
मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास, चेंगराचेंगरी होऊन लोकांना इजा होण्याची शक्यता असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने, अशा परिस्थितीत योग्य नियोजन आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास, अपघात आणि इतर घटना घडण्याची शक्यता असते. 

दहीहंडीच्या गर्दीचा व्हिडिओ पाहून, गणेशोत्सवात होणारी गर्दी आणि तिची सुरक्षितता याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवासारख्या मोठ्या उत्सवांमध्ये, योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही. प्रशासनाने यावर योग्य ती पाऊले उचलण्याची गरज आहे, जेणेकरून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल.

यंदाची दहीहंडी डीजेशिवाय..

दरम्यान, शनिवारी रात्री पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल चौक भाविकांच्या आणि गोविंदांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता. यंदा पहिल्यांदाच डीजे-मुक्त दहीहंडीसाठी साजरी झाली. या वेळी ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांनी ताल धरला होता. हजारो लोक अनोख्या उत्साहात दहीहंडीसाठी जमले होते.

या वर्षी, विविध दहीहंडी आयोजकांनी कर्कश डीजेच्या आवाजाशिवाय त्याच उर्जेने आणि उत्साहाने उत्सव साजरा करू शकल्याबदद्ल समाधान व्यक्त केले. यामुळे ध्वनी प्रदूषण कमी झाले, पोलिसांचा दबाव कमी झाला, वाहतुकीची कोंडी टाळली आणि पारंपारिक वादकांना रोजगार मिळाला. या वर्षी, पुण्यात मोठ्या प्रमाणात सुरक्षा उपाययोजना, वैद्यकीय मदत आणि सुलभ गर्दी नियंत्रणाद्वारे उत्सव साजरा करण्यात आला. या वर्षी, श्रीकृष्ण जन्माष्टमी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील 25 हून अधिक गणेश मंडळे यावर्षी डीजे-मुक्त कार्यक्रमासाठी एकत्र आली.

हेही वाचा - निसर्गाच्या सानिध्यात आजोबांनी धरला ठेका; व्हिडीओ एकदा बघाच...


सम्बन्धित सामग्री