Sunday, August 31, 2025 02:55:15 PM

गिरगावमधील इस्कॉन मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस यंत्रणा सतर्क

धमकीत तामिळनाडूतील एका राजकीय प्रकरणाचा संदर्भ देण्यात आला असून नैनर दास यांच्या शिफारशी लागू न केल्यास स्फोट घडवून आणण्यात येईल, असा दावा करण्यात आला आहे.

गिरगावमधील इस्कॉन मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी पोलीस यंत्रणा सतर्क
Bomb threat to ISKCON temple
Edited Image

Bomb Threat To ISKCON Temple: मुंबईच्या गिरगाव परिसरातील प्रसिद्ध इस्कॉन मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. 'इमॅन्युएल_सेकरन' नावाच्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आलेल्या धमकीत 16 तासांच्या आत काही राजकीय मागण्या पूर्ण न झाल्यास पाच आरडीएक्स बॉम्बने मंदिर आणि परिसर उडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. धमकीत तामिळनाडूतील एका राजकीय प्रकरणाचा संदर्भ देण्यात आला असून नैनर दास यांच्या शिफारशी लागू न केल्यास स्फोट घडवून आणण्यात येईल, असा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा - मुंबईत पुन्हा एकदा शाळेला बॉम्बची धमकी; केईएस इंटरनॅशनल स्कूलला धमकीचा इ-मेल

पोलिसांकडून कारवाई

धमकीचा ईमेल मिळताच मुंबई पोलिसांनी तात्काळ गमदेवी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. केंद्रीय आणि राज्य सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून मंदिर आणि परिसरात सुरक्षेची अतिरिक्त व्यवस्था तातडीने तैनात करण्यात आली आहे.

हेही वाचा - राम मंदिराच्या काही कारणामुळे नालासोपाऱ्यातील दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, यापूर्वीदेखील अशाच पद्धतीने धमकी ईमेलद्वारे प्राप्त झाल्या आहेत. सध्या कोणताही ठोस पुरावा अथवा संशयास्पद हालचाल आढळलेली नाही. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. तथापी, मुंबई पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहनही  केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री