Monday, September 01, 2025 12:58:40 AM

गुंगीचे औषध पाजून तरुणीवर तीन जणांकडून अत्याचार; शुद्धीवर आल्यावर....

सांगलीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर अत्याचार झाला आहे. तीन जणांकडून तरुणीला गुंगीचे औषध पाजून अत्याचार करण्यात आला आहे.

गुंगीचे औषध पाजून तरुणीवर तीन जणांकडून अत्याचार शुद्धीवर आल्यावर

सांगली : सांगलीत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर अत्याचार झाला आहे. तीन जणांकडून तरुणीला गुंगीचे औषध पाजून अत्याचार करण्यात आला आहे. शुद्धीवर आल्याने तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले आहे. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 

सांगलीमध्ये एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तिघा जणांनी पीडित तरूणीला गुंगीचे ड्रिंक देऊन हा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संशयित तिघा तरुणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पैकी दोघे आणि पीडित तरुणी हे शहरातल्या एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होते. मंगळवारी पिडीत तरुणीला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने तिच्या दोघा मित्रांनी त्यांच्या रूमवर नेले. त्यानंतर तरुणीला गुंगीचे औषध ड्रिंक्समध्ये देण्यात आले. त्यानंतर तिघा मित्रांनी दारूच्या नशेत तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. घटनेनंतर शुद्धीवर आलेल्या तरुणीने आपली सुटका करत थेट विश्रामबाग पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकाराबाबत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तात्काळ तीन संशयितांना अटक केली आहे.
हेही वाचा : नागपुरात झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क देण्याचाही मार्ग मोकळा; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती

आजकाल वारंवार मुलीसोबत बलात्काराच्या घटना घडत आहेत. अशी कृत्य करणे अत्यंत संतापजनक आहे. संबंधित आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तरुणीच्या मित्रांकडूनच तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. त्यामुळे विश्वासाचे जग राहिलेले नाही.  मुलींनी कोणावरही विश्वास दाखवणे चुकीचे आहे. 


सम्बन्धित सामग्री