Monday, September 01, 2025 12:57:09 AM

वाहतूक कोंडीने घेतला महिलेचा जीव! पालघरमध्ये 49 वर्षीय महिलेचा रुग्णवाहिकेतच मृत्यू

49 वर्षीय छाया पुरव या महिलेला झाडाची फांदी पडल्याने गंभीर दुखापत झाली होती. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच रुग्णवाहिकेत त्यांचा मृत्यू झाला.

वाहतूक कोंडीने घेतला महिलेचा जीव पालघरमध्ये 49 वर्षीय महिलेचा रुग्णवाहिकेतच मृत्यू
Edited Image

पालघर: पालघर जिल्ह्यातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 49 वर्षीय छाया पुरव या महिलेला झाडाची फांदी पडल्याने गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या डोक्याला आणि बरगड्यांना मोठ्या प्रमाणात मार लागला होता. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच रुग्णवाहिकेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन आरोग्य सुविधांच्या अभावावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही घटना 31 जुलै रोजी दुपारी घडली. जखमी छाया पुरव यांना सुरुवातीला प्राथमिक उपचार मिळाले, परंतु त्यांच्या गंभीर अवस्थेमुळे त्यांना मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. पालघर जिल्ह्यात ट्रॉमा हॉस्पिटल नसल्याने त्यांच्या घरापासून सुमारे 100 किलोमीटर दूर असलेल्या हिंदुजा हॉस्पिटलकडे जाणे हा एकमेव पर्याय होता. दुपारी 3 वाजता रुग्णवाहिका निघाली. साधारण अडीच तासांचा हा प्रवास असला तरी, राष्ट्रीय महामार्ग-48 वर भीषण वाहतूक कोंडी होती. तीन तास उलटून गेले तरी रुग्णवाहिका अर्ध्या अंतरापर्यंतच पोहोचली होती. 

हेही वाचा - भंडाऱ्यात धारदार शस्त्रांनी 2 तरुणांची निर्घृण हत्या

याशिवाय, भूल देण्याचे उपकरण निकामी होऊ लागल्याने छाया पुरव यांना असह्य वेदना होऊ लागल्या. रुग्णवाहिकेत त्यांचा पती कौशिक पुरव त्यांच्यासोबत होते. त्यांनी तातडीने वैद्यकीय मदत मिळावी म्हणून आग्रह धरला. परिस्थिती गंभीर होत असल्याने, रुग्णवाहिका मीरा रोडवरील ऑर्बिट हॉस्पिटलकडे वळवण्यात आली, जे हिंदुजा हॉस्पिटलपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच छाया पुरव यांची प्रकृती अधिकच खालावली आणि उपचार सुरू होण्याआधीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

हेही वाचा - धक्कादायक! दिघी येथे ATM मधून पैसे काढताना विजेचा धक्का लागून 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

कौशिक पुरव यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, अर्धा तास आधी पोहोचलो असतो, तर तिचा जीव वाचला असता. मी तिला चार तास असह्य वेदना सहन करताना पाहिले. वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांनी तिचा त्रास अधिकच वाढवला. ती सतत मदतीसाठी याचना करत राहिली, पण आम्ही काही करू शकलो नाही. 
 


सम्बन्धित सामग्री