Wednesday, August 20, 2025 10:25:09 AM

Jan Akrosh Andolan : 'भ्रष्ट मंत्र्यांची खुर्ची काढून घ्या'; जनआक्रोश आंदोलनात उद्धव ठाकरेंची फडणवीस सरकारवर टीका

जनआक्रोश आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.

jan akrosh andolan  भ्रष्ट मंत्र्यांची खुर्ची काढून घ्या जनआक्रोश आंदोलनात उद्धव ठाकरेंची फडणवीस सरकारवर टीका

मुंबई : मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने आयोजित जनआक्रोश आंदोलनात (Jan Akrosh Andolan) सहभागी झालेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. हे भ्रष्टाचाऱ्यांच सरकार आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध विषयांवर प्रश्न केले. त्यांच्या सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांचे तुम्ही काय केले, त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असा सवाल करत ही जनआक्रोश आंदोलनाची सुरूवात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार आदित्य ठाकरे हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.  

हेही वाचा : Jitendra Awhad Meat Controversy: 'बापाचं राज्य आहे का?'; स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंदीवर जितेंद्र आव्हाडांचा संताप


सम्बन्धित सामग्री