Wednesday, August 20, 2025 01:27:57 PM

'व्हेज-नॉनव्हेज पदार्थ वेगळे शिजवावे. अन्यथा...'; अन्न सुरक्षा आयुक्तांचा इशारा

व्हेज आणि नॉन-व्हेज जेवण एकाच जागेत बनवत असल्याचा प्रकार समोर आल्यामुळे पुण्यातील हॉटेलांना, 'व्हेज-नॉनव्हेज पदार्थ वेगळे शिजवावेत, अन्यथा परवाने रद्द करण्यात येणार', असा इशारा देण्यात आला आहे.

व्हेज-नॉनव्हेज पदार्थ वेगळे शिजवावे अन्यथा अन्न सुरक्षा आयुक्तांचा इशारा

पुणे: 'पुणे तिथे काय उणे?'. पुणे म्हणजे विद्या माहेरघर. मात्र, मागील काही काळापासून विद्येच्या या माहेरघरात अनेक प्रकार घडत आहेत. पुण्यातील अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये तसेच इतर खाण्याच्या ठिकाणी व्हेज आणि नॉन-व्हेज जेवण एकाच कढईत किंवा एकाच जागेत बनवत असल्याचा प्रकार समोर आल्यामुळे पुण्यातील हॉटेलांना अन्न सुरक्षा आयुक्तांकडून, 'व्हेज-नॉनव्हेज पदार्थ वेगळे शिजवावेत, अन्यथा परवाने रद्द करण्यात येणार', असा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: SAWANTWADI RAINFALL: सावंतवाडीत दोन घरांवर पडली वीज; वीजमीटर जळून खाक

काय म्हणाले अन्न सुरक्षा आयुक्त?

अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर म्हणाले की, 'अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 अंतर्गत, अन्न सुरक्षा आणि मानके (परवाना आणि नोंदणी) नियम, 2011 मधील अनुसूची तसेच 4 मधील सूचनांनुसार शाकाहारी आणि मांसाहारी अन्नाची तयारी, प्रक्रिया आणि स्वयंपाक वेगवेगळा असावा. प्रक्रिया आणि साठवणुकीच्या टप्प्यावर शाकाहारी अन्न आणि मांसाहारी अन्न स्पष्टपणे वेगळे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे अन्न व्यावसायिक अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांचे परवाने रद्द केले जातील. तसेच त्यांच्याकडून दंड आकारला जाईल किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल'.

पुढे, अन्न सुरक्षा आयुक्त म्हणाले की, 'सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. गेल्या वर्षी अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यातील 30,000 अन्न व्यवसाय चालकांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण दिले. या वर्षी एक लाख अन्न व्यवसाय चालकांना प्रशिक्षण देण्याची त्यांची योजना आहे. अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीर बाब नाही तर ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित एक अतिशय महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. नियमांचे पालन न केल्याबाबत दोषी आढळलेल्या अन्न प्रतिष्ठानांना तात्काळ सूचना दिल्या जात आहेत, कारवाई केली जात आहे आणि आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे'.


सम्बन्धित सामग्री