Wednesday, August 20, 2025 10:26:19 PM

दमानियांकडून व्हिडीओ व्हायरल; धसांवर केले मोठे आरोप

बीडमधील भाजपा कार्यकर्त्याचा नवा प्रताप समोर आला आहे.

दमानियांकडून व्हिडीओ व्हायरल धसांवर केले मोठे आरोप

मुंबई : बीडमधील भाजपा कार्यकर्त्याचा नवा प्रताप समोर आला आहे. नुकतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सतीश भोसलेचा आहे. कारमध्ये पैशांचा बंडल फेकतानाचा हा व्हिडीओ आहे. या प्रकरणाविरोधात चौकशी करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.  


बीडमधील भाजपा कार्यकर्त्याचा व्हिडीओ अंजली दमानिया यांच्याकडून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सतीश भोसलेचा आहे. कारमध्ये पैशांचे बंडल फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ संदर्भात चौकशी करण्याची मागणी दमानिया यांनी केली आहे. हा आरोपी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे.   

हेही वाचा : 'अबू आझमीला उत्तर प्रदेशात पाठवा' योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य

भाजप आमदार सुरेश धस यांच्या समर्थकाने एका गरीब व्यक्तीला बॅटच्या सहाय्याने अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सतीश भोसले असे या व्यक्तीचे नाव असून तो भाजपचा कार्यकर्ता आहे. सतीश भोसलेचा आता आणखी एक प्रताप उघड झाला आहे. त्याचा कारमध्ये पैशांचे बंडल फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सतीश भोसले हा कारमध्ये 500 च्या नोटांचे बंडल फेकताना दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत हा कार्यकर्ता कोण? आणि याच्याकडे एवढे पैसे कुठून आले? याची चौकशी करा आणि अटक करा असे म्हटले आहे.


अंजली दमानियांची पोस्ट 
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हटले की हे काय आहे काय?  गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे. हा मारणारा माणूस सुरेश धसचा कार्यकर्ता आहे का? बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पहा. बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा हा वीडियो पहा. अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असे दमानियांकडून सांगण्यात आले आहे. एसपी नवनीत कावत यांनी हा व्हिडीओ जुना असल्याचे सांगितले. तसेच FIR झाली नाही. कारण कोणी कंप्लेंट केली नाही. आज ते Suo Moto कंप्लेंट घेत आहेत आणि तत्काळ कारवाई करतील असेही दमानिया यांनी म्हटले आहे. 


 


सम्बन्धित सामग्री