Wednesday, August 20, 2025 08:17:31 AM

Satish Bhosle : खोक्या भोसलेचा ताबा घेतला, प्रयागराज कोर्टात हजर करणार, बीडमधून हद्दपार!

मागील काही दिवसांपासून खोक्या भोसलेवर विविध गुन्हे दाखल होत होते, मात्र तो फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला प्रयागराज येथून अटक करून बीडमधून हद्दपार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

satish bhosle  खोक्या भोसलेचा ताबा घेतला  प्रयागराज कोर्टात हजर करणार बीडमधून हद्दपार

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वात चर्चेत असेलला सतीश ऊर्फ खोक्या भोसले अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. बीड पोलिसांनी प्रयागराज येथे त्याचा ताबा घेतला असून, आज  त्याला प्रयागराजच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. मागील काही दिवसांपासून खोक्या भोसलेवर विविध गुन्हे दाखल होत होते, मात्र तो फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला प्रयागराज येथून अटक करून बीडमधून हद्दपार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 

खोक्याचा गुन्हेगारी प्रवास उघड
गेल्या काही दिवसांत खोक्या भोसलेवर गुन्ह्यांचा डोंगर वाढत गेला. बुलढाणा जिल्ह्यात एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर बावी गावातील शेतकरी पिता-पुत्राला हरणाच्या शिकारीला विरोध केल्यामुळे मारहाण केल्याचा दुसरा गुन्हा नोंदवण्यात आला. एवढेच नव्हे, तर त्याने 200 हरणांची शिकार केल्याचा गंभीर आरोपही झाला होता. बुधवारी त्याच्या घरातून 600 ग्रॅम गांजा जप्त झाल्यानंतर तिसरा गुन्हा नोंदवण्यात आला. या सर्व घटनांमुळे खोक्या भोसलेचे नाव गुन्हेगारी जगतात अधिकच चर्चेत आले.
गेल्या काही दिवसांत खोक्या भोसलेवर गुन्ह्यांचा डोंगर वाढत गेला. बुलढाणा जिल्ह्यात एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा 

हेही वाचा: स्वारगेट प्रकरणात नवा वाद, आरोपीच्या वकिलांच्या वक्तव्यामुळे खळबळ!

आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया 
खोक्या भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा समर्थक असल्याचा आरोप होत होता. मात्र, या आरोपांना खंडन करत आमदार धस म्हणाले, “त्याला अटक झाली हे योग्यच आहे. मी त्याला वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. कायद्याप्रमाणे कठोर कारवाई व्हावी, अशी माझी भूमिका आहे.” या वक्तव्यामुळे आमदार धस यांनी खोक्याशी असलेली कोणतीही जवळीक नाकारली आहे.

खोक्या भोसलेच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे बीड पोलिसांनी त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वीच सादर केला होता. मात्र, तो प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर एसडीएम कविता जाधव यांनी बुधवारी त्याला बीड जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. 
 


सम्बन्धित सामग्री