Monday, September 01, 2025 02:45:59 AM

वेव्हज शिखर परिषदेची यशस्वीपणे सांगता,परिषदेत 77 देश झाले सहभागी

व्हीएफएक्सपासून गेमिंगपर्यंत विविध क्षेत्रातील अद्यायावत तंत्रज्ञान हे सगळे एका छताखाली आणणाऱ्या मुंबईतील वेव्हज शिखर परिषदेची रविवारी यशस्वीपणे सांगता झाली.

वेव्हज शिखर परिषदेची यशस्वीपणे सांगतापरिषदेत 77 देश झाले सहभागी

मुंबई: जागतिक स्तरावरील सर्जनशील आशयनिर्माते, मनोरंजन विश्वातील नामांकित उद्याोग कंपन्या, व्हीएफएक्सपासून गेमिंगपर्यंत विविध क्षेत्रातील अद्यायावत तंत्रज्ञान हे सगळे एका छताखाली आणणाऱ्या मुंबईतील वेव्हज शिखर परिषदेची रविवारी यशस्वीपणे सांगता झाली. 1 ते 4 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या वेव्हज परिषदेत 77 देशांनी आपला सहभाग नोंदवला. या परिषदेत वेव्हज बाजार, वेव्हएक्स 2025 अशा विविध उपक्रमांतर्गत तसेच, मनोरंजन क्षेत्रातील विविध व्यावसायिकांच्या एकत्रित भेटीतून 1328 कोटी रुपयांची उलाढाल झाली.

 पीआयबीकडून स्पष्टोक्ती - WAVES 2025
 मुंबईतील बीकेसी येथे 1 मे पासून वेव्हज-2025 परिषदेचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान, या परिषदेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध क्षेत्रातील अर्थात कला, संगीत, नाट्य, मीडिया, न्यूज, टेक्नॉलॉजी, ऑडिओ, व्हिडिओ, कंटेंट रायटर आदींनी सहभाग घेतला. तसंच अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी वेव्हजमध्ये हजेरी लावली. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं या परिषदेचं आयोजन केलं होतं. या परिषदेला सर्वांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असं पीआयबीकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे.

वेव्ह्जमध्ये निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवर हजर होते. तसेच देशभरातील अनेक कलाकार आणि क्रिएटिव्ह कंटेंट रायटर यांना या परिषदेमुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक मंच मिळाला. आगामी काळात हेच कलाकार आपल्या देशाचं नाव पुढं करणार आहेत. अशा परिषदेतून नवनवीन टॅलेंट पुढे येतील आणि अर्थव्यवस्थेला ही चालना मिळेल. असं नोडल ऑफिसर आशुतोष मोहले यांनी यावेळी सांगितलं.


सम्बन्धित सामग्री