Monday, September 01, 2025 06:36:09 AM

काय सांगता, बोकडाची किंमत चक्क 1 लाख रुपये

सध्या मुस्लिम बांधवांचा बकरी ईदचा सण जवळ येत असल्याने बोकडाला चांगल्या प्रकारची मागणी छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड येथील शेंळी बाजारपेठेत झाली आहे.

काय सांगता बोकडाची किंमत चक्क 1 लाख रुपये

विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सध्या मुस्लिम बांधवांचा बकरी ईदचा सण जवळ येत असल्याने बोकडाला चांगल्या प्रकारची मागणी छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड येथील शेंळी बाजारपेठेत झाली आहे. ईदच्या पार्श्‍वभूमीवर बोकडाची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मुरमा येथील शेतकरी रामेश्वर मापारी व संजय मापारी यांच्या बीटल (राजस्थानी) जातीचा असलेल्या बोकडला आता 95 हजार रूपयांची बोली लागली आहे. 
पैठण तालुक्यातील मुरमा येथील शेतकरी रामेश्वर मापारी यांच्याकडे 24 महिन्यांचा बीटल जातीचा राजस्थानी 2 दात असलेला बोकड आहे. तो बोकड त्यांनी पाचोड येथील रविवारी आठवडी बाजारात विक्रीसाठी नेला असता, त्याला 95 हजार रुपयांपर्यंत मागणी करण्यात आली आहे. या बकऱ्याची खासियत अशी आहे की, या बोकडाचे वजन लवकर वाढते. तसा दिसण्यासाठी देखणा असतो. सध्या ईद तोंडावर आली असल्याने मुस्लिम बांधव या बोकडाला अधिक पसंती दर्शवत आहेत. त्यामुळे या बकऱ्याची किंमत 95 हजार रुपये लावण्यात आली आहे. सध्या बोकड्याचे वजन 120 किलो पेक्षा अधिक आहे. हा राजस्थानी बकरा असल्यामुळे या बकऱ्यांची किंमत इतर बकऱ्यांपेक्षा अधिक असते. मात्र , मापारी बंधूंना हवी असलेली व अपेक्षेप्रमाणे रक्कम न मिळाल्याने त्यांनी तो बोकड विकला नाही. रामेश्वर आणि संजय मापारी यांनी बोकडाची किंमत सव्वा लाख रुपये इतकी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

हेही वाचा : मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक; 'या' वेळेत असेल ब्लॉक

या बकऱ्यासाठी आतापर्यंत 1 लाख रूपये किंमत देण्यासाठी लोक तयार झाले आहेत. त्यांचं मत आहे की, त्यांनी या बकऱ्याला फार लाडाने वाढवलं आहे. हा बकरा 2 वर्षाचा असून 120 किलो पेक्षा जास्त याचं वजन आहे. त्याला हिरव्या गवतासोबत चना डाळ, गहूं आणि शेंगदाणे दिवसातून तीनदा खाऊ घातले. त्याची काळजी घेतली. सध्या ते आणखी चांगल्या किंमतीची वाट बघत आहेत असे रामेश्वर मापारी आणि त्याचे बंधू संजय मापारी यांनी म्हटलं आहे.


सम्बन्धित सामग्री