Thursday, August 21, 2025 12:07:01 AM

मराठवाड्यातील 'या' चार जिल्ह्यांना यलो अलर्ट

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. संभाजीनगर, जालना, लातूर, बीडमध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट

मराठवाडा: मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. संभाजीनगर, जालना, लातूर, बीडमध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, लातूर आणि बीड या जिल्ह्यांत पुढील 24 तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून 24 तासांसाठी यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिवमध्ये आज तुरळक पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह तुरळक हलका पाऊस होऊ शकतो. मात्र, हवामान विभागाने जिल्ह्यांना सतर्कतेचा कोणताही अलर्ट दिलेला नाही. दरम्यान, मराठवाड्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून आकाश ढगाळ आहे. मात्र, तुरळक ठिकाणी हलक्या सरी वगळता कुठेही जोरदार पाऊस झालेला नाही. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या असून शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

हेही वाचा : तटकरे कुटुंबियांनी सरकारी जमीन लाटली; महेंद्र थोरवेंचा गंभीर आरोप

जायकवाडी धरणात 14 हजार क्युसेकने विसर्ग 
छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या जायकवाडी धरणात आज वरच्या धरणातून येणाऱ्या विसर्गाचे पाणी दाखल होणार आहे. सध्या 14 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचा साठा 29.66 टक्के झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी साठा फक्त 5.5 टक्के होता. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची आवक सुरू झाली. गोदावरी नदीच्या पात्रात नाशिकसह इतर धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आजपासून जायकवाडीत पाण्याची वाढ होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री