Sunday, August 31, 2025 05:14:39 PM

Mumbai Rains Today Updates: मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अर्लट जारी; हवामान विभागाकडून हलक्या पावसाचा अंदाज

हवामान विभागाने बुधवारी सकाळी यलो इशारा जारी करत पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, सांगली आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

mumbai rains today updates मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अर्लट जारी हवामान विभागाकडून हलक्या पावसाचा अंदाज

Mumbai Rains Today Updates: भारतीय हवामान विभागाने बुधवारी सकाळी यलो इशारा जारी करत पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, सातारा, सांगली आणि सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मते, मुंबई आणि उपनगरांमध्ये दिवसभर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कधीकधी 30-40 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. भरती-ओहोटीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दुपारी 2:13 वाजता 4.07 मीटर उंचीची भरती अपेक्षित असून, रात्री 8:12 वाजता 0.95 मीटरची ओहोटी होणार आहे. उद्या, 28 ऑगस्ट रोजी पहाटे 2:37 वाजता 3.88 मीटरची भरती येईल, तर सकाळी 8:02 वाजता 1.70 मीटरची ओहोटी येईल.

हेही वाचा - Manoj Jarange Patil Big news : मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करणार; या 3 मुख्य अटींसह सशर्त परवानगी

मुंबईतील पाणीपुरवठा स्थिती सुधारली - 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांची पाणी पातळी 96.74 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, बुधवारी या तलावांमध्ये 14,00,219 दशलक्ष लिटर पाणीसाठा नोंदला गेला आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अप्पर वैतरणा (96.60%), तानसा (99.10%), मध्य वैतरणा (97.40%) जवळपास भरले आहेत. मोडक सागर, तुळशी आणि वेहार तलाव तर 100% भरले आहेत. सर्वात मोठा भातसा तलाव देखील 95.52% क्षमतेपर्यंत भरला असून, शहराला आगामी काही महिन्यांसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray Arrive at Raj Thackeray’s Residence: उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतलं राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचे दर्शन, पहा व्हिडिओ

अधिकाऱ्यांनी सांगितले की, या वर्षी वेळेत आलेल्या पावसामुळे शहरासाठी पाणीटंचाईची चिंता दूर झाली आहे. भांडुप संकुलात आतापर्यंत 2383 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज असून तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.


सम्बन्धित सामग्री