Wednesday, August 20, 2025 10:16:55 AM

Gold Price Target 2025 : सोन्याचे दर कायम वाढतील का?

सध्या सोन्याचे दर विक्रमी उच्चांक गाठत असून सोन्याच्या दरात मागील तीन महिन्यात साधारणपणे 15 हजार रूपयांची वाढ झाली आहे.

gold price target 2025  सोन्याचे दर कायम वाढतील का
Gold Price Target 2025 : सोन्याचे दर कायम वाढतील का?

Gold Price Target 2025 : भारतीय मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. आपल्या भारतीयांसाठी सोने हे गुंतवणुकीचे साधन नाही तर सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचं आहे. सध्या सोन्याचे दर विक्रमी उच्चांक गाठत आहेत. पुढे देखील सोन्याचे दर वाढणार की घसरणार? मागील इतिहास काय आहे? तसेच एक्सपर्टचे म्हणणं काय आहे, ते आपण या लेखांच्या माध्यमातून पाहुयात.. 

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सोन्याचे दर सुमारे 40 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील 50 वर्षांतील ही सर्वाधिक वाढ आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी सोन्याचा दर 76 हजार 583 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. जो 1 एप्रिलपर्यंत 91 हजार 115 रुपये झाला आहे. हा केवळ पहिल्या तिमाहीचा आकडा आहे. 

हेही वाचा - Waqf Board Property: भारतात वक्फ बोर्डाची मालमत्ता किती आहे? आकडा ऐकून व्हाल अवाक!

कोरोना काळात काय होते सोन्याचे दर 
सोने दराचा इतिहास पाहता, सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर घसरतात. 1979-80 मध्ये महागाईमुळं सोन्याच्या किंमतीत 125 टक्क्यांनी वाढ झाली होती. परंतु 1980 मध्ये सहा महिन्यांत 55 टक्के घसरण झाली. 2008-2011 च्या आर्थिक मंदीत सोन्याचे दर 160 टक्क्यांनी वाढले होते. पण 2011-2013 दरम्यान त्यात 35 टक्क्यांनी घट झाली. कोरोना काळात मार्च-ऑगस्ट 2020 मध्ये 37 टक्के वाढल्यानंतर सप्टेंबर 2022 पर्यंत 15 टक्के घसरण झाली. त्यामुळे भविष्यात किंमती खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

हेही वाचा - EPFO चा नवा निर्णय, पेन्शन आणि PF काढणे होणार आणखी सोपे

सोन्याचे दर आणखी वाढू शकतात 
काही एक्सपर्टच्या मते, जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळं सोन्याचे दर आणखी वाढू शकतात. सध्या गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडं वळत आहेत. त्यामुळं किंमती वाढू शकतात. ते किती पर्यंत वाढू शकतात, याबाबतचा अंदाज व्यक्त करणं कठिण आहे. सध्याच्या उच्चांकी दरांमुळे गुंतवणुकीचा निर्णय घाईगडबडीत घेणे जोखीम ठरू शकते. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर स्पष्टता येईपर्यंत थोडे थांबावं, असा सल्ला गुंतवणूक करणाऱ्यांना एक्सपर्टनी दिला आहे. 

 


 


सम्बन्धित सामग्री