Wednesday, August 20, 2025 10:47:28 PM

सिगारेट आणि तंबाखूवरील GST वाढणार? कराचा दर 40% पर्यंत जाण्याची शक्यता!

तंबाखू आणि सिगारेटप्रेमींना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण, भारत सरकार तंबाखूजन्य उत्पादनांवरील  GST 40% पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे.

सिगारेट आणि तंबाखूवरील gst वाढणार कराचा दर 40 पर्यंत जाण्याची शक्यता

तंबाखू आणि सिगारेटप्रेमींना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण, भारत सरकार तंबाखूजन्य उत्पादनांवरील  GST 40% पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे. तसेच, 2026 नंतर अतिरिक्त उत्पादन शुल्क (Excise Duty) लावण्याचाही प्रस्ताव आहे. 

सध्याची स्थिती काय आहे? 
    •    सध्या सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांवर 28% GST आणि इतर कर मिळून एकूण 53% कर आकारला जातो.
    •    मात्र, WHO ने या उत्पादनांवरील कर 75% असावा अशी शिफारस केली आहे.
    •    यामुळे सरकार तंबाखूवरील कर वाढवण्याचा विचार करत आहे.

दरम्यान, तंबाखूजन्य उत्पादनांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता GST कौन्सिलने हा कर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे.

हेही वाचा: उन्हाळ्याची गरमी कमी करणारे 2025 मधील टॉप 5 स्टार AC

याचा परिणाम काय होईल?
    •    सिगारेट, तंबाखू, गुटखा, बीडी यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.
    •    उच्च करामुळे धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
    •    सरकारच्या महसुलात वाढ होईल, परंतु तंबाखू उद्योगावर परिणाम होऊ शकतो.


सम्बन्धित सामग्री