Wednesday, August 20, 2025 10:26:05 PM

शेअर बाजारात पैसे गुंतवायचे नसतील तर 'या' ठिकाणी करा गुंतवणूक; अल्पावधीतचं व्हाल मालामाल!

बाजारात सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. परंतु, आता अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणं थांबवलं असून ते आता गुंतवणूकीसाठी इतर पर्याय शोधत आहेत.

शेअर बाजारात पैसे गुंतवायचे नसतील तर या ठिकाणी करा गुंतवणूक अल्पावधीतचं व्हाल मालामाल
Best Investment Options
Edited Image

Best Investment Options: गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 810 अंकांनी घसरला. बाजारात सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. परंतु, आता अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करणं थांबवलं असून ते आता गुंतवणूकीसाठी इतर पर्याय शोधत आहेत. तुम्ही देखील गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपचं फायद्याची ठरणार आहे. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करायची नसेल तर आम्ही तुमच्यासाठी काही सुरक्षित पर्याय घेऊन आलो आहोत. याठिकाणी तुम्ही अगदी सुरक्षितरित्या तुमची गुंतवणूक करू शकता. तसेच जास्तीत जास्त नफा मिळवू शकता. 

सोने - 

जर तुम्हाला सुरक्षित आणि वाढत्या मालमत्तेत गुंतवणूक करायची असेल तर सोने तुमच्यासाठी योग्य आहे कारण कालांतराने सोन्याचे मूल्य वाढते. यासोबतच, सोने नेहमीच स्थिरता आणि सुरक्षितता प्रदान करते. तुम्ही भौतिक सोनं न घेता गोल्ड बाँड किंवा गोल्ड ईटीएफद्वारे सोन्यात गुंतवणूक करू शकता. 

मुदत ठेवी - 

मुदत ठेवी ही बँका किंवा वित्तीय संस्थांमध्ये गुंतवणूक करण्याचा एक सुरक्षित मार्ग आहे, जिथे तुम्ही तुमचे पैसे एका निश्चित कालावधीसाठी जमा करता आणि त्यावर बँक तुम्हाला व्याज देते. जर तुम्हाला जोखीम पत्करायची नसेल आणि तुम्ही स्थिर उत्पन्नाच्या शोधात असाल तर मुदत ठेवी तुमच्यासाठी परिपूर्ण आहेत.

हेही वाचा - भारतातील 'या' टॉप 5 सर्वात श्रीमंत महिला युट्यूबर्स तुम्हाला माहित आहेत का? त्यांची एकूण संपत्ती ऐकून व्हाल अवाक!

म्युच्युअल फंड - 

जर तुम्हाला शेअर बाजाराशी संबंधित जोखीम टाळून चांगला परतावा हवा असेल, तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी योग्य आहेत. म्युच्युअल फंड तुम्हाला विविधतेचा फायदा देतात, ज्यामुळे जोखीम कमी होते. म्युच्युअल फंडांमध्ये विविध गुंतवणूक पर्याय असतात, जसे की डेट फंड, इक्विटी फंड आणि बॅलन्स्ड फंड.

रिपॉझिटरीज आणि सिक्युरिटीज गुंतवणूक - 

ही गुंतवणूक रिअल इस्टेट क्षेत्रात केली जाते. परंतु, यासाठी तुम्हाला थेट मालमत्ता खरेदी करण्याची आवश्यकता नाही. REITs मध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला रिअल इस्टेटमधून फायदे मिळतात. जर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल. पण थेट मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसे नसतील तर हा तुमच्यासाठी एक गुंतवणूकीचा उत्तर पर्याय ठरू शकतो. 

बाँड्स - 

बाँड्स, विशेषतः सरकारी बाँड्स आणि कॉर्पोरेट बाँड्स, ही सुरक्षित गुंतवणूक आहे जी नियमित व्याज देते. जर तुम्हाला नियमित उत्पन्न हवे असेल आणि जोखीम कमी करायची असेल तर गुंतवणूकीचा हा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे.

हेही वाचा - CIBIL Score बिघडण्याची 'ही' आहेत सर्वात मोठी कारणे

रिअल इस्टेट - 

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मालमत्ता खरेदी करणे, ती भाड्याने देणे किंवा भविष्यात तिचे मूल्य वाढेल या आशेने ती खरेदी करणे आवश्यक आहे. यामुळे दीर्घकाळात चांगले उत्पन्न मिळू शकते. रिअल इस्टेट हा देखील तुमच्यासाठी एक चांगला गुंतवणूक पर्याय ठरू शकतो. 

विमा पॉलिसी - 

जीवन विमा पॉलिसी गुंतवणुकीचा एक चांगला मार्ग असू शकतो. विमा पॉलिसी तुमच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी चांगला पर्याय आहे. तसेच विमा पॉलिस घेतल्यास तुम्हाला करात सुट मिळू शकते. वरील सर्व सुरक्षित पर्यायांचा विचार करून तुम्ही तुमच्या गुंतवणूकीपासून जास्त-जास्त नफा मिळवू शकता. 
 


सम्बन्धित सामग्री