Sunday, August 31, 2025 04:40:38 PM

आता लहान गुंतवणूकदारही करू शकतात म्युच्युअल फंडात गुंतवणूक; SBI Mutual Fund ने सुरु केली 250 रुपयांची JanNivesh SIP

एसबीआय म्युच्युअल फंडने जननिवेश एसआयपी लाँच केली. ज्यामध्ये गरीब आणि कामगार वर्गातील गुंतवणूकदार देखील सहजपणे गुंतवणूक करू शकतील आणि एक मोठा निधी तयार करू शकतील.

आता लहान गुंतवणूकदारही करू शकतात म्युच्युअल फंडात गुंतवणूक sbi mutual fund ने सुरु केली 250 रुपयांची jannivesh sip
JanNivesh SIP
Edited Image

SBI JanNivesh SIP: लहान गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांशी जोडण्यासाठी, एसबीआयचे अध्यक्ष सीएस शेट्टी आणि सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी JanNivesh SIP सुरू केली. जेणेकरून अधिकाधिक लोकांना म्युच्युअल फंडाचा लाभ घेता येईल. लहान गुंतवणूकदारांनाही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी यासाठी, एसबीआयने एक स्वस्त आणि उत्तम गुंतवणूक योजना आणली आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदार कमी रकमेतून मोठा निधी तयार करू शकतील. एसबीआय म्युच्युअल फंडने जननिवेश एसआयपी लाँच केली. ज्यामध्ये गरीब आणि कामगार वर्गातील गुंतवणूकदार देखील सहजपणे गुंतवणूक करू शकतील आणि एक मोठा निधी तयार करू शकतील.

लहान गुंतवणुकदारांसाठी JanNivesh SIP ठरणार फायदेशीर -  

केंद्र सरकारने सर्व वर्गातील लोकांसाठी बँक खाती उघडण्यासाठी प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली होती. ज्या अंतर्गत आतापर्यंत 50 कोटींहून अधिक लोकांची खाती उघडण्यात आली आहेत. आता, अशा सर्व वर्गातील लोकांना गुंतवणूक सुलभ करण्यासाठी, सरकारने जननिवेश एसआयपी सुरू केली आहे.

हेही वाचा - Short-Term Agricultural Loan: शॉर्ट-टर्म कृषी कर्ज कसे काढावे? काय आहेत याचे फायदे? जाणून घ्या

JanNivesh SIP म्हणजे काय आहे?

लहान गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांशी जोडण्यासाठी, एसबीआयचे अध्यक्ष सीएस शेट्टी आणि सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी जननिवेश एसआयपी सुरू केली. जेणेकरून अधिकाधिक लोकांना म्युच्युअल फंडांचा लाभ घेता येईल.

SBI ची 'ही' योजना या लोकांसाठी आहे खास - 

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एसबीआय म्युच्युअल फंडने सुरू केलेली जननिवेश एसआयपी ही अशा गुंतवणूकदारांसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्यांना एसआयपी सुरू करायची आहे. परंतु, पुरेशा पैशांअभावी ते त्याची सुरुवात करू शकत नाहीत. अशा लोकांना लक्षात घेऊन, फक्त 250 रुपयांपासून एसआयपी करण्याची ही खास योजना सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा - शेअर बाजारात पैसे गुंतवायचे नसतील तर 'या' ठिकाणी करा गुंतवणूक; अल्पावधीतचं व्हाल मालामाल!

जननिवेश एसआयपीमध्ये तुम्ही कशी गुंतवणूक करू शकता?

ही योजना पूर्णपणे डिजिटल आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदार दररोज, आठवड्याला, मासिक गुंतवणूक करू शकतात. कोणीही त्यात सहज गुंतवणूक करू शकतो. एसबीआयच्या योनो अॅप व्यतिरिक्त, एसबीआय जननिवेश एसआयपीमध्ये गुंतवणूक झिरोधा, ग्रो, पेटीएम सारख्या फिनटेक प्लॅटफॉर्मद्वारे देखील तुम्ही या एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकता. 
 


सम्बन्धित सामग्री