सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने गृह आणि कार कर्जांसह त्यांच्या किरकोळ कर्जांवरील व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात कपात केल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पाच वर्षांच्या अंतरानंतर, 7 फेब्रुवारी रोजी, आरबीआयने रेपो दर 0.35 टक्क्यांनी कमी करून 6.25 टक्के केला.
दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्रने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, या कपातीनंतर, गृहकर्जांसाठीचा त्यांचा बेंचमार्क दर 8.10% पर्यंत कमी झाला आहे, जो बँकिंग उद्योगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहे.
हेही वाचा - अदानी समूहाच्या कंपन्या भरत आहेत 'मोदी सरकार'ची तिजोरी! गेल्या वर्षी भरला 58,104 कोटी रुपयांचा टॅक्स
कार लोनवरील व्याजदरात कपात -
तथापी, कार कर्जावरील व्याजदर 8.45 टक्क्यांवर आला आहे. त्याच वेळी, शैक्षणिक कर्ज आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) एक चतुर्थांश टक्क्यांनी कमी झाला आहे. बँकेने गृह आणि कार कर्जावरील प्रक्रिया शुल्क आधीच माफ केले आहे. बँकेने म्हटले आहे की, 'व्याजदरात कपात आणि प्रक्रिया शुल्कात माफीचा हा दुहेरी फायदा बँकेच्या सर्व ग्राहकांना दिला जात आहे. सर्वांना सर्वोत्तम वित्तपुरवठा उपाय प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पूर्तता हे करते.'
हेही वाचा - भारतातील १ रुपया 'या' देशात आहेत तब्बल २९६ रुपये. जाणून घ्या
पंजाब नॅशनल बँकेने केली व्याजदरात कपात -
दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेनेही अलीकडेच व्याजदर कमी केले आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने अनेक प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर कमी केले आहेत. यामुळे पीएनबीचे गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि शैक्षणिक कर्ज स्वस्त झाले आहे. बँकेचे नवे दर 10 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, पीएनबी बँकेचे कार कर्ज 8.50% वार्षिक व्याजदराने उपलब्ध आहे.